पाचोरा पोलिसांचा तपास
पाचोरा (प्रतिनिधी) : शहरातील आठवडे बाजार येथून झारखंड येथील मोबाईल चोरट्यास पाचोरा पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याचेकडून दोन चोरी केलेले मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.
पाचोरा शहरातील आठवडे बाजार येथुन ईश्वर पाटील (रा. गुरुदत्त नगर, पाचोरा) यांचा ८ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीस गेल्याची घटना दि. २५ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली होती. ईश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा छडा लावत पाचोरा पोलिसांनी आठवडे बाजार येथुन रोहन कुमार चौरसिया (वय १८, रा. झारखंड) या तरुणास ताब्यात घेण्यात आले.
त्याचेकडून ८ हजार रुपये किंमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. रोहनकुमार चौरसिया याचेविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल विश्वास देशमुख हे करीत आहे.