• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 19, 2026
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई, विश्व
0
‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’


जळगाव क्रिकेट लिगमध्ये षटकार, चौकारांची आतीषबाजी

जळगाव ( प्रतिनिधी ) –  जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६,  JCL T-20 क्रिकेटमध्ये चौकार षटकारांची आतीषबाजी बघायला मिळत आहे. दुसऱ्या सामन्यात जळगाव कोगटा किंगचा ओम भोसले याने धुवांधार शतक ठोकले. चाळीसगाव एसपीसीसी चॅलेर्न्सजच्या गोलंदाजींचा समाचार घेत त्याने ५८ चेंडूमध्ये ९ चौकार व  ६ षटकार लगावत १०८ धावा करुन एकतर्फी सामना फिरवला.

शनिवारी झालेल्या उद्घाटन सामन्यात उपस्थित असलेले मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, अशोक जैन यांच्या उपस्थितीत नाणफेक झाली. चाळीसगाव एसपीसीसी चॅलेर्न्सजने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जळगाव क्रिकेट लीगमधील सर्वाधिक महाग ठरलेल्या कर्णधार ओम मुंडे याने ४८ चेंडूत ८१ धावा केल्यात. त्यात त्याने ५ चौकार व ४ षटकार लगावले. त्याला ११ चौकार व १ षटकारच्या मदतीने ८१ धावा ५८ चेंडूत करत साहिल गायकर याने उत्तम साथ दिली. दोघांच्या जोरदार खेळीमुळे निर्धारित २० षटकात ६ गडींच्या मोबदल्यात १७६ धावा केल्यात.

जळगाव कोगटा किंग संघाने १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओम भोसले व जितेंद्र नाईक यांनी संयम व आक्रमता दाखवित गोलदाजांवर जोरदार प्रहार केला. शतकवीर ओम भोसले याला जितेंद्र नाईक याने ३३ चेंडूत ४१ धावा त्यात (५ चौकार व १ षटकार) करत चांगली साथ दिली. धावगतीवर कुठलाही परिणाम न होऊ देता दोघांनी एकतर्फी सामना खेचून आणला. १६.४ षटकांत १७७ धावांचे लक्ष्य दोन गड्यांच्या मोबल्यात सहज पूर्ण केले. मनिष चव्हाण याने तीन चौकारच्या मदतीने ९ चेंडूंमध्ये १६ धावा करत विजयाची औपचारिकता पुर्ण केली. चाळीसगाव चॅलेर्न्सजच्या ओम मुंडे, अमेय कोळी यांना प्रत्येकी १ गडी बाद करता आले.

दरम्यान सामनावीर म्हणून ओम भोसले यांना गौरविण्यात आले. तर जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या संकल्पनेतून मोस्ट डॉट बॉल म्हणून मेहुल इंगळे याने ४ ओव्हर मध्ये २८ धावा देत २ विकेट घेतल्याने त्याला सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी नवरंग चहाचे अमर कुकरेजा, अलरिक इलेक्टि्कलचे सीईओ दीपक चौधरी, वरिष्ठ व्हाईस प्रेसिडेंट प्रविण कुंजवाला, दाल परिवाराचे अतुल कोगटा, सागर क्रिकेट क्लबचे विजय मराठे यांची उपस्थिती होती. पंच म्हणून संदीप गांगुर्डे, संदीप चव्हाण यांनी काम पाहिले तर थर्ट अम्पायर मंगेश नार्वेकर, मॅच रेफरी म्हणून विनित कुलकर्णी यांनी काम पाहिले.

जैन ड्रीम स्पेसेसच्या क्रीडांगणावर सोमवारी तीन सामने

दि. २० एप्रिल सकाळी ८.३० वाजेला चाळीसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स विरूद्ध जामनेर सातपुडा हिरोज.

दि. २० एप्रिल दुपारी ३ वाजेला जळगाव कोगटा किंग विरूद्ध पाचोरा एसकेटी योद्धाज.

दि. २० एप्रिल सायंकाळी ७.३० वाजेला अमळनेर सुहांस जायंट्स विरुद्ध रावेर रॉयल्स.

फोटो कॅप्शन –

(OM BOSALE) – जळगाव कोगटा किंगचा शतकवीर ओम मुंढे

(Untitled design (1)) – विजयी टिम चे पारितोषीक स्वीकारताना जळगाव कोगटा किंगचा कर्णधार जगदीश झोपे.

 (DSC5971(1)(1))  पन्नास धावा पूर्ण केल्यानंतर आनंद साजरा करताना ओम मुंढे


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtra
Previous Post

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

Next Post

जळगावात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर तलवारीने हल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
काचेची बाटली डोक्यात मारून डेअरी दुकानदाराला केले जखमी

जळगावात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर तलवारीने हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध
1xbet russia

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
Uncategorized

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

चाळीसगाव हादरले! १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडितेने दिला बालकाला जन्म

July 18, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

एकाच रात्री पाच वाहनांतील बॅटऱ्या लंपास; संशयित काही तासांत जेरबंद

July 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon