• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 21, 2026
in जैन कंपनी, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई, विश्व
0
भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार जाहीर

कांताई जैन साहित्य-कला जीवन गौरव पुरस्कार शमा भाटेंना;बालकवी ठोमरे श्रीकांत ढेरंगे, बहिणाई चौधरी डॉ. मीनाक्षी पाटील;तर ना. धों महानोर पुरस्कार अच्युत गोडबोले यांना जाहीर

जळगाव, (प्रतिनिधी) – जैन उद्योग समूहाची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे व्दिवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ सुप्रसिद्ध नृत्यांगना शमा भाटे यांना तर श्रेष्ठ लेखिका म्हणून कवयित्री बहिणाई पुरस्कारासाठी डॉ. मीनाक्षी पाटील (मुंबई), श्रेष्ठ कवी म्हणून बालकवी ठोमरे पुरस्कारासाठी श्रीकांत ढेरंगे (संगमनेर, जि. अहिल्यानगर) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कारासाठी अच्युत गोडबोले (मुंबई) यांना जाहीर झाला आहे. कांताई साहित्य-कला जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे तर कवयित्री बहिणाई, बालकवी ठोमरे, ना. धों. महानोर  पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी एक लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे. श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या संजीवन दिनाच्या दुसऱ्या दिवशी १३ डिसेंबर २०२६ रोजी जळगाव येथे पुरस्कार सोहळा होणार आहे.
साहित्य-कला पुरस्कार प्रदान समितीची मुंबई येथे नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत निवड समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे, बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टच्या सौ. ज्योती जैन, रंगनाथ पठारे, प्रा. डॉ. सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, डॉ. सिसिलीया कार्व्हालो, शंभू पाटील, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन व शोभा नाईक (बेळगाव)(दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून) यांची उपस्थिती होती. डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यिक मान्यवरांकडून प्राप्त झालेल्या शिफारसींचा विचार करून सर्वानुमते २०२५ या वर्षांसाठीच्या चारही पुरस्कारांची निवड करण्यात आली. ‘भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’ व ‘बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील वाङमयीन क्षेत्रातील प्रतिभावंत, अनुभवसिद्ध लेखकांची कारकीर्द आणि बदलत्या साहित्यप्रवासाची सकारात्मक नोंद घेऊन ही निवड केली जाते.
जैन उद्योग समूहाच्या कल्याणकारी अंग असलेल्या ‘भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’ हा ट्रस्ट जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक डॉ. भवरलालजी जैन यांच्या पुढाकारातून साकारला आहे. या ट्रस्टतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. साहित्यिक उपक्रमांतर्गत बहिणाबाईंच्या नावे अखिल भारतीय पातळीवर ‘बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट’तर्फे कवयित्री बहिणाई पुरस्कार, ‘भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’तर्फे बालकवी ठोमरे पुरस्कार, तसेच ना. धों. महानोर पुरस्कार दिला जातो. हे पुरस्कार देण्याबाबतचे बीजारोपण जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी केले आहे. काव्य, कथा, कादंबरी, गद्यलेखन आदी वाङमय लेखनात लक्षणीय कामगिरी करणार्‍या साहित्यिकांची निवड करण्यात येते. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील प्रथितयश कवी, साहित्यिक, समीक्षकांकडून शिफारशी मागविण्यात येतात. शिफारस केलेल्या साहित्यिकांच्या कार्याचा आढावा घेऊन निवड समिती अंतिम पुरस्कारार्थींची निवड करते. पहिला पुरस्कार जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना सन्मानपूर्वक प्रदान केला आहे. तर यंदाचा चौथा पुरस्कार नृत्य क्षेत्रातील ख्यातनाम शमा भाटे यांना जाहीर झाला आहे.

कला-साहित्य क्षेत्रातील प्रतिभावंतांना यथोचित गौरव व्हावा यासाठी विविधस्तरावर रचनात्मक कार्य जैन उद्योग समूहातर्फे सुरूच असते. भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टतर्फे देण्यात येणारे कला-साहित्य पुरस्कार जाहीर करताना आनंद होत आहे.
– अशोक जैन, अध्यक्ष, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन

संपूर्ण महाराष्ट्रातील प्रातिनिधीक जाणकार साहित्यिकांच्या समितीने एकमताने केलेली ही निवड आतापर्यंतच्या कला-साहित्य पुरस्कार प्राप्त लेखकांच्या परंपरेत शोभून दिसतात.
– डॉ. भालचंद्र नेमाडे, अध्यक्ष, निवड समिती

 पुरस्कारार्थींचा परिचय –

1)   शमा भाटे – शमा भाटे यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९५०, बेळगाव येथे झाला. या ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शिका आणि गुरू आहेत. वयाच्या चौथ्या वर्षापासून नृत्यसाधना करणाऱ्या त्यांनी गुरू रोहिणी भाटे, पं. बिरजू महाराज, पं. मोहनराव कल्याणपूरकर आणि पं. सुरेश तळवलकर यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. पुण्यात त्यांनी ‘नादरूप’ अकादमीची स्थापना केली. पारंपरिक व आधुनिक कथ्थक नृत्यात नावीन्यपूर्ण प्रयोग करत त्यांनी अनेक शिष्य घडवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३० हून अधिक विद्यार्थिनींनी पदव्युत्तर पदवी मिळवली. २०१३ चा मधुरिता सारंग स्मृती पुरस्कार आणि २०१९ चा गुरू रोहिणी भाटे पुरस्कार यांसह विविध सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले.
2)   डॉ. मीनाक्षी पाटील –  डॉ. मीनाक्षी पाटील या कवयित्री, चित्रकार, ललित लेखिका आणि समीक्षक असून सध्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव म्हणून कार्यरत आहेत. मुंबई विद्यापीठातून बी.ए. आणि एम.ए. (सौंदर्यशास्त्र) परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांना पाच सुवर्णपदके प्राप्त झाली आहेत. ‘निवडक कवींच्या कवितांचा उत्तर-आधुनिकतावादाच्या दृष्टिकोनातून चिकित्सक अभ्यास’ या विषयावर त्यांनी पीएच.डी. संपादन केली आहे. ‘इज इट इन युअर डीएनए’, ‘ललद्यदस् ललबाय’, ‘उत्तर-आधुनिकता आणि मराठी कविता’ हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ आहेत. त्यांच्या कविता विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत.
कविता, समीक्षा, लोकसाहित्य, चित्रकला आणि दृश्यकलेच्या विविध माध्यमातील त्यांचे योगदान लक्षणीय आहे. पु. भा. भावे पुरस्कार, मनोरमा फाउंडेशन साहित्य पुरस्का या सह इतर पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
shrikant dherange3)   श्रीकांत ढेरंगे – कवी, लेखक, अनुवादक आणि पत्रकार असून साहित्याकडे सांस्कृतिक व सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून पाहणारे अभ्यासक आहेत. बहुजन समाजाचे सांस्कृतिक अवकाश, तसेच शिव-फुले-शाहू-आंबेडकर आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारपरंपरेशी जोडलेली लेखनदृष्टी हे त्यांच्या साहित्यचिंतनाचे वैशिष्ट्य आहे. ‘टिंब टिंब अक्षरांचे उडाले थवे’, ‘आडतासाच्या कविता’ आणि ‘चित्रक’ हे त्यांचे प्रकाशित साहित्य असून, आचार्य चतुरसेन यांच्या हिंदी कादंबरीचा त्यांनी ‘वयं रक्षामः’ या नावाने मराठी अनुवाद केला आहे. त्यांच्या ‘आडतासाच्या कविता’ या संग्रहाला कवी केशवसुत पुरस्कार, पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार आणि आद्यकवी मुकुंदराज पुरस्कार यांसह विविध सन्मान मिळाले आहेत. ‘चित्रक’ या साहित्यकृतीलाही २०२६ मध्ये विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.


4)   अच्युत गोडबोले – अच्युत गोडबोले हे प्रसिद्ध लेखक, विचारवंत, संगणकतज्ज्ञ आणि व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व आहेत. १९७२ मध्ये आयआयटी मुंबईतून केमिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. सॉफ्टवेअर क्षेत्रात भारत, इंग्लंड आणि अमेरिका येथे ३२ वर्षांचा अनुभव घेत त्यांनी अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यासारखी सर्वोच्च पदे भूषवली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कंपन्यांच्या विस्तारात महत्त्वाचे योगदान मिळाले.
विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, अर्थशास्त्र, संगीत, साहित्य, तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र अशा विविध विषयांवर त्यांनी मराठीत सुमारे ९० पुस्तके लिहिली असून, त्यांपैकी ७५ प्रकाशित झाली आहेत. संगणकविषयक चार संदर्भग्रंथांचेही त्यांनी लेखन केले आहे. आयआयटीचा ‘डिस्टिंग्विश्ड ॲल्युमनस’ पुरस्कार, कुमार गंधर्व पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि अनेक जीवनगौरव पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

फोटो कॅप्शन – पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र नेमाडे, सदस्य रंगनाथ पठारे, अतुल जैन,  प्रा. डॉ. सदानंद देशमुख, शंभू पाटील, श्रीकांत देशमुख, डॉ. सिसिलीया कार्व्हालो.

१) डॉ. मीनाक्षी गोडबोले, २) श्रीकांत ढेरंगे, ३) शमा भाटे


 

 

Tags: https://kesariraj.com/jain-foundetion-kala-puraskar/
Previous Post

पुणे सीआयडीचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ‘शौर्य’ जळगाव पोलीस दलात दाखल!

Next Post

‘ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

‘ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हमीपत्रात ५०, यादीत १००; मग कचरा उचलायला वाहने कुठे?
खान्देश

हमीपत्रात ५०, यादीत १००; मग कचरा उचलायला वाहने कुठे?

October 21, 2026
‘ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव
जैन कंपनी

‘ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026
भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार जाहीर
जैन कंपनी

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार जाहीर

October 21, 2026
पुणे सीआयडीचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ‘शौर्य’ जळगाव पोलीस दलात दाखल!
खान्देश

पुणे सीआयडीचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ‘शौर्य’ जळगाव पोलीस दलात दाखल!

October 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हमीपत्रात ५०, यादीत १००; मग कचरा उचलायला वाहने कुठे?

हमीपत्रात ५०, यादीत १००; मग कचरा उचलायला वाहने कुठे?

October 21, 2026
‘ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

‘ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon