गुन्हे शोध मोहिमेला मिळणार बळ
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव पोलीस दलात गुन्हे शोध मोहिमेसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा ‘शौर्य’ हा श्वान पुणे येथील सीआयडीच्या डॉग ट्रेनिंग सेंटरमधील नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून जळगाव पोलीस दलात दाखल झाला आहे.


प्रशिक्षण पूर्ण करून सेवेत रुजू झाल्यानंतर शौर्यला इतर पोलीस अधिकाऱ्यांप्रमाणे पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आले.
शौर्य हा बेल्जियन मॅलिनॉइस जातीचा श्वान असून, त्याचा जन्म १ ऑगस्ट २०२५ रोजी झाला आहे. गुन्हे शोधक श्वान (ट्रॅकर डॉग) म्हणून त्याचा उपयोग केला जाणार आहे. जळगाव पोलीस दलाने शौर्यला ६५ हजार रुपये खर्च करून घेतले होते. त्यानंतर त्याला विशेष प्रशिक्षणासाठी पुणे येथील सीआयडीच्या डॉग ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठविण्यात आले होते.
प्रशिक्षण पूर्ण करून सेवेत रुजू झाल्यानंतर शौर्यला जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत ढिवरे यांनी या संदर्भात माहिती घेतली यावेळी इतर पोलीस हजर होते.








