धरणगाव महाविद्यालयातील उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : – कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, धरणगाव येथील एनएसएस विभाग, विज्ञान मंडळ व वनविभाग एरंडोल परीक्षेत्रातर्फे संयुक्तपणे महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय शिंगाणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. पंकज देशमुख, वनस्पती विभागाच्या प्रमुख डॉ. कांचन महाजन, ए .व्ही. साळुंखे, वनपाल राजवड, वनरक्षक एस. व्ही. थारेकर, वनरक्षक गणेश धानोरे व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. अभिजीत जोशी, डॉ. ज्योती महाजन, डॉ. गजानन जाधव, प्रा.अमित पाटील, सलीम खाटीक, शांताराम पाटील, गजानन सैंदाणे, सागर शृंगारराव यांची उपस्थिती लाभली.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बायोलॉजिस्ट आयडियल ऑर्गनायझेशनचे विवेक देसाई यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पावर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले. खानदेशामध्ये आढळणाऱ्या विविध वन्यजीवांबद्दल, तसेच एखादा हिस्त्र वन्यजीव अचानक जर आपल्यासमोर आला तर आपला बचाव कशा पद्धतीने करावा. याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच बिबटे, वाघ यांना कॉलर आय.डी. लावून त्यांचा कसा अभ्यास केला जातो, याचप्रकारे डॉ. बाबा आमटे यांच्या आनंदवनात प्राण्यांची निगा कशा पद्धतीने घेतली जाते, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव महाजन यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुजित जैन व एनएसएस स्वयंसेवक, स्वयंसेविका यांचे सहकार्य लाभले.