
जळगाव (प्रतिनिधी):- येथील गोदावरी फाउंडेशन संचलित, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागातर्फे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरात जागतिक पर्यावरण दिन २०२६ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.


यावर्षीच्या निसर्गापासून प्रेरित. हवामानासाठी. आपल्या भविष्यासाठी.या विशेष उपक्रमात महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. जेसिंथ धाया, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागाचे प्रमुख प्रा. निर्भय मोहोड, प्रा. मेनाओदेवी खुराईजम, प्रा. कॉलेट लोंढे, प्रा. आश्लेषा मून,प्रा. रितेश पडघान, प्रा. सुमित भारंबे आणि प्रा. डीवायना पवार या प्राध्यापक व कर्मचार्यांसह नर्सिंगच्या ७ व्या सत्रातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला उपस्थित सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचार्यांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली. नंतर महाविद्यालय व रुग्णालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले.
गोदावरी नर्सिंग कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटतर्फे ’प्लास्टिकमुक्त परिसर’ मोहिमेचे आयोजन
जळगाव:पर्यावरणाचा समतोल राखणे आणि भावी पिढीला सुरक्षित भविष्य देणे ही काळाची गरज ओळखून, येथील गोदावरी नर्सिंग कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटतर्फे महाविद्यालयात प्लास्टिकमुक्त परिसर या जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या जनजागृती मोहिमेदरम्यान उपस्थित सर्वांनी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवण्याचा आणि नो टू प्लास्टिकचा ठाम निर्धार करत, स्वच्छ, हरित आणि निरोगी पर्यावरणासाठी योगदान देण्याची सामूहिक शपथ घेतली.
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव
जळगाव – डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव खु. येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व मिशन लाईफ उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, रुग्णालय कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती तसेच शाश्वत जीवनशैलीचा संकल्प करण्यात आला.मिशन लाईफ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांमध्ये वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, जलसंधारणाबाबत जनजागृती, प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी विविध उपक्रम, कचरा वर्गीकरण तसेच इतर पर्यावरणपूरक पद्धतींचा समावेश करण्यात आला होता. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे आवश्यक असल्याचे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांनी सांगितले.
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव
जळगाव – दि. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील ग्रामीण कृषी कार्य अनुभव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व, वृक्षारोपण, जलसंधारण तसेच प्रदूषण नियंत्रण याविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून दिपक प्रमिला चंद्रकांत कदम, सहाय्यक गटविकास अधिकारी (वर्ग-२) उपस्थित होते. त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले व पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व विशद केले.विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली तसेच झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश देत वृक्षारोपण केले. कार्यक्रमाद्वारे पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले.
बी.एस्सी. अॅग्रीकल्चर अंतिम वर्ष
मस्कावद खुर्द:पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येकाने निसर्गाच्या रक्षणासाठी पुढे आले पाहिजे, हा संदेश देत डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील बी.एस्सी. अॅग्रीकल्चर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मस्कावद खुर्द येथे वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृतीचा स्तुत्य उपक्रम राबवला.
विद्यार्थ्यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. हरित गाव, स्वच्छ गाव, सुंदर गाव – पर्यावरण दिनानिमित्त एक पाऊल निसर्गाच्या दिशेने हे ब्रीदवाक्य समोर ठेवून विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून दिले.या उपक्रमाला मस्कावद ग्रामपंचायतीच्या सरपंच मा. अलका पाटील आणि उपसरपंच मा. प्रकाश तायडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हा संपूर्ण उपक्रम कार्यक्रम अधिकारी प्रा.कार्तिक ए. खारचे यांच्या नियोजनाखाली आणि मार्गदर्शनाखाली पार पडला. अभिजित सदानशिव, हर्षद जैन,धिरज खेडकर, संकेत अघाव, अरविंद गौड,शेख जीशान विद्यार्थ्यांनी केवळ वृक्षारोपण न करता, लावलेल्या रोपांचे संवर्धन आणि संगोपन करण्याची जबाबदारी देखील घेतली आहे.









