• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वी

शेकडो गुन्हेगारांवर कारवाई; दारुबंदी, जुगार, अवैध शस्त्रे व वाहतूक नियमभंग प्रकरणांत लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगाव ( प्रतिनिधी ) :- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलीस दलाने राबविलेली ‘ऑपरेशन ऑल आऊट’ ही विशेष मोहीम मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत शेकडो गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असून विविध गुन्ह्यांमध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/06/WhatsApp-Video-2026-06-06-at-16.07.34-2.mp4

या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, विशेष पथके तसेच वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. जिल्हाभर नाकाबंदी करून संशयित व्यक्ती, वाहने आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची कसून तपासणी करण्यात आली. फरार आरोपी, पाहिजे आरोपी, रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली.

दारुबंदी, जुगार आणि शस्त्रांविरोधात मोठी कारवाई

मोहिमेदरम्यान दारुबंदी कायद्यांतर्गत १९६ गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे २१.६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगारविरोधी कारवाईत ७६ गुन्हे दाखल करून रोख रक्कम व साहित्य जप्त करण्यात आले. तसेच अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोन गुन्हे नोंदविण्यात आले.

याशिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाई करत १,४४३ मोटार वाहन कायद्याचे गुन्हे दाखल करण्यात आले असून जवळपास ९.४८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

फरार आरोपींचा शोध, तडीपारांवरही कारवाई

विशेष मोहिमेदरम्यान ४२ नॉन-बेलेबल वॉरंट (NBW) आणि ५२ बेलेबल वॉरंट (BW) बजावण्यात आले. दोन पाहिजे आरोपींना अटक करण्यात आली तर पाच तडीपार आरोपींवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अंतर्गत कारवाई करण्यात आली.

संशयास्पद हालचाली करणाऱ्या पाच व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असून २०१ आरोपींवर BNSS कलम १२६ आणि १७ आरोपींवर BNSS कलम १२९ अन्वये कारवाई करण्यात आली.

अवैध वाळू व अंमली पदार्थांविरोधात धडक मोहीम

अवैध वाळू वाहतुकीविरोधात सहा गुन्हे, तर अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत दहा गुन्हे दाखल करण्यात आले. नाकाबंदी दरम्यान ३२७ वाहनांची तपासणी करण्यात आली. याशिवाय जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या बेपत्ता व्यक्तींपैकी ३४ जणांचा शोध घेण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी

या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकानेही उल्लेखनीय कामगिरी बजावली. दारुबंदीच्या १० प्रकरणांत १ लाख ७५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगाराच्या ६ प्रकरणांत ५ हजार ३२० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. एका पाहिजे आरोपीला अटक करण्यात आली तर तीन तडीपार आरोपींवर कारवाई करण्यात आली. तसेच अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शस्त्र अधिनियमांतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला.

नागरिकांना सहकार्याचे आवाहन

जळगाव जिल्हा पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असून भविष्यातही अशा विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले आहे. कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


 

 

Tags: jalgaon police opretion all out news
Previous Post

गोदावरीच्या विविध प्रकल्पात पर्यावरण दिवसानिमीत्त वृक्षरोपण

Next Post

शिरसोलीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिरसोलीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

शिरसोलीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon