आरोग्य अधिकाऱ्यांची उपस्थिती; विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या व हात धुण्याच्या योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक
शिरसोली (प्रतिनिधी) : शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच जंतनाशक गोळी देण्याची योग्य पद्धत आणि हात स्वच्छ धुण्याच्या पद्धतीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.


या उपक्रमासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. धापटे, तालुका गटविकास अधिकारी श्री. शशिकांत बोडरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांढरे आणि तालुका सुपरवायझर श्री. चंद्रशेखर महाजन यांनी विद्यालयाला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना जंतसंसर्गापासून बचाव करण्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. जंतनाशक गोळ्यांचा योग्य वापर कसा करावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे अध्यक्ष ॲड. निलेश भाऊ खलसे, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र आंबटकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. शालिकराम बारी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्य विभागाच्या वतीने उपकेंद्र शिरसोली प्र. न. येथील डॉ. तेजस्विनी देशमुख (सीएचओ), आरोग्य सेवक श्री. प्रवीण भोळे, श्री. गजानन घ्यार आणि श्री. सलीम पिंजारी यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य व स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि जंतसंसर्गापासून बचाव करण्यासाठी योग्य सवयी रुजविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. आरोग्य विभाग आणि विद्यालयाच्या संयुक्त प्रयत्नांतून हा कार्यक्रम पार पडला.








