डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे तालुक्यातील गावांमध्ये २६ ऑक्टोबर ते ४ डिसेंबर दरम्यान होणार नेत्र तपासणी


जळगाव, ( प्रतिनिधी )- गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयातर्फे रावेर,यावल तालुक्यात यशस्वीतेनंतर आज ‘मोतीबिंदूमुक्त चोपडा तालुका’ या विशेष अभियानाला प्रारंभ करण्यात आला असून तालुक्यातील प्रत्येक गावात जावून नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.
चोपडा तालुक्यातील नेत्र तपासणी शिबिरांचे वेळापत्रक: २६ रोजी धानोरा, मोहरद, बीडगाव, या गावात शुभारंभ प्रसंगी या अभियानासाठी डॉ. एन. एस. आर्विकर आणि डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्ररोग तज्ञ डॉ. नि.तु पाटील यांचेसह डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयुरी निलावाड, डॉ. सृष्टी पाटील, डॉ. निखिल चौधरी, डॉ. शुभम् भारसाकळे, डॉ. अभिजीत काकड, डॉ. अनीष कांदळगावकर, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. रिया गोरे, डॉ. कीर्ती महाजन, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. गौरव पाटील, डॉ. वैष्णव व्यवहारे, डॉ. ऋतुजा चव्हाण आणि डॉ. अश्विनी काकडे.हे डॉक्टर रुग्णसेवेत योगदान देणार आहे.
आज पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळाला असून तिन्ही गावात शेकडो नागकिरांची नेत्रतपासणी तज्ञांच्या टीमने केली. दि २८ आक्टों रोजी अडावद, सुटकर, खुर्डी, ३० वड्री, मंगरुळा, वडली तर २ नोव्हें विश्णापूर, अडगाव, विरवाडे,४ नागलवाडी, वराड, गणापूर,१३ चांदसणी, कमलगाव, पंचक,१६ वैजापूर, देन्हारी, उमर्टी,१८ सत्रासेन, लासूर, चौगाव,२० अकुलखेडा, चहार्डी, हातेड,२३ बुधगाव, अनवरदे, वाळसी,२७ कुसुना, वेळोदे, वनेदा,३० खाचगे, कुरवेल, तावसे,२ डिसेंबर: निमगाव, वेले, गरनाड,तर ४ डिसेंबरला कलोबा, कठोरा, वटकर या गावात समारोप केला जाणार आहे.
तरी चोपडा तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात तपासणी करून घ्यावी असे आवाहन रूग्णालय प्रशासनाने केले आहे. रावेर आणि यावल तालुक्यात ‘मोतीबिंदूमुक्त तालुका’ अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दोन्ही तालुक्यांमध्ये अभियानाच्या माध्यमातून हजारो नागरिकांची नेत्रतपासणी करून गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
या यशस्वी अनुभवातून प्रेरणा घेत आता चोपडा तालुकाही मोतीबिंदूमुक्त करण्याचा आमचा मानस आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन शेवटच्या घटकापर्यंत नेत्रसेवा पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणालाही दृष्टी गमवावी लागू नये, तसेच मोतीबिंदूमुळे कोणाचेही जीवन अंधारमय होऊ नये, हेच या अभियानाचे उद्दिष्ट आहे. नागरिकांनीही पुढाकार घेऊन नेत्रतपासणी करून घ्यावी आणि गरजू रुग्णांना या अभियानाचा लाभ मिळवून द्यावा.‡ डॉ. नितू पाटील, नेत्ररोगतज्ज्ञ





