
रासगाव येथील घटना; जळगाव तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव, ( प्रतिनिधी ) : जळगाव तालुक्यातील रासगाव येथील २५ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नालसिंग दखन्या पाटील (वय २५, रा. रासगाव) यांनी भोकर परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर संबंधित तरुणाला मृत घोषित केले. घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाने जळगाव तालुका पोलिसांना दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे रासगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.









