जळगाव (प्रतिनिधी) – येथील आर.सी. बाफना स्वाध्याय भवन येथे प्रसिद्ध होमिओपॅथी डॉ. निधी जैन मंडलेश्वर यांचे सोमवार दि. ९ रोजी सकाळी १० ते ४ दरम्यान मोफत होमिओपॅथी शिबिर आयोजित केले आहे.
शिबिरासाठी नाव नोंदणी आवश्यक असल्याने दि. ८ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी असे आयोजकांनी कळविले आहे. शिबिरात बद्धकोष्ठता, गॅस, ऍसिडिटी, मायग्रेन, बालपणीचे आजार, स्त्रीरोग, मानसिक रोग, त्वचा रोग, सर्व प्रकारच्या ऍलर्जी, जीवनशैलीशी संबंधित आजार जसे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, कोलेस्टेरॉल, गुडघेदुखी, पाठदुखी इ. रोगांची मोफत तपासणी आणि होमिओपॅथी औषधांचे वाटप केले जाईल.
या शिबिरासाठी येणाऱ्यांनी आपले जुने रिपोर्ट सोबत आणावे म्हणजे निदान करण्यास सोयीचे जाईल. जेणेकरून अचूक उपचार करणे शक्य होईल. नोंदणीसाठी डॉ.निधी जैन,अजय राखेचा यांच्या क्रमांकावर एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप पाठवावा असेही कळविण्यात आले आहे.