चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण फाट्यावरील घटना
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव- धुळे रस्त्यावरील चिंचगव्हाण फाट्यावरील दहिवद शिवारात शेतात अंदाजे ४९ वर्षीय अनोळखी पुरुषाने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. ४) सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली. मेहुनबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दहिवद शिवारातील गट क्रमांक ३४९ मधील शेतात निंबाच्या गळफास घेतलेल्या अनोळखीच्या बाबतीत शरद पवार व गोविंदा महाजन यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. आत्महत्या करणारा अनोळखी चिंचगव्हाण परिसरातील नसल्याची खात्री झाली असून त्याची ओळख पटविण्याचे आवाहन सहायक निरीक्षक विष्णू आव्हाड व उपनिरीक्षक गोपाल पाटील यांनी केले आहे. विश्वास वाघ यांनी दिलेल्या माहितीवरून मेहुणबारे पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.