जळगाव शहरातील आदर्श नगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील आदर्श नगरातील सुरूधी आपार्टमेंट येथील दोन बंद घर फोडून रोकडसह सोन्याचे दागिने असा एकुण ५० हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना मंगळवारी ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
जळगाव शहरातील आदर्श नगरात सुरूधी अपार्टमेंट येथील तिसऱ्या मजल्यावर व्यावसायिक नानक रामचंद्र कारडा हे पत्नी, तीन मुली व मुलासह वास्तव्याला आहे. मंगळवारी ३ ऑक्टोबर रोजी दुपारी नानक हे एमआयडीतील फॅक्टरीवर निघून गेले. नंतर एक चोरटा कुरीअर बॉय असल्याचे सांगून अपार्टमेंटमध्ये घुसला. त्याच अपार्टमेटच्या दुसऱ्या मजल्यावरील एका घराची बेल वाजविली. त्यावेळी घरात मोलकरीने दार उघडले असता, ओसवाल इथे राहतात का अशी विचारणा चोरट्याने केली. त्यावर ते इथे राहत नाही असे सांगितल्यावर चोरटा निघून गेला.