जळगाव ( प्रतिनिधी ) – वाघूर धारण पूर्ण भरण्याच्या परिस्थितीमध्ये असल्याने पाटबंधारे खात्याने या धरण्याचे सध्या ८ दरवाजे उघडलेले आहेत . गेल्या महिनाभरात पावसाचा अनुभव लक्षात घेऊन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.
वाघुर धरण क्षेत्रात संततधार पावसाने जलाशयाच्या पाणी पातळी मध्ये वाढ होत आहे.सद्यस्थितीत वाघूर धरणाचे 8 द्वारे उघडण्यात आली आहे व त्या द्वारे 10060 क्युसेक वेगाने विसर्ग सोडण्यात आलेला आहे कोणीही नदीपात्रा जवळ जाऊ नये , असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे