भडगाव ( प्रतिनिधी ) – गेल्या महिनाभरात पाऊस आणि पुरामुळे खान्देश आणि मराठवाड्याला जोडण्यासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या कजगाव ते नागद रस्त्याची दुर्दशा झाली आहे या महत्वाच्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष होत असल्याने या भागात संताप व्यक्त होत आहे
भडगाव तालुक्यातील कजगाव येथे काही दिवसांपूर्वी दोन दिवस जोरदार पावसाने झोडपले होते तितुर नदीच्या उगमस्थानावर झालेल्या जोरदार पावसाने तितुर नदीला यंदा तब्बल चौथ्या वेळेस महापूर आला महापुराने सर्वच नुकसान केले कजगाव येथील कजगाव — नागद रस्ता महापुरात वाहून गेला आहे हाच रस्ता भडगाव व पाचोरा तालुक्याला जोडतो पुढे जाऊन थेट मराठवाड्याला जाऊन भिडतो मात्र महापुरामुळे वाहून गेलेला रस्ता सध्या नागरिकांना अडचणीचा ठरत आहे
या रस्त्यावर शेकडो शेतकऱ्याच्या शेतजमिनी आहेत दिवसभर येथून शेतकऱ्यांचा संचार असतो परीसरातील पंचवीसहुन अधिक खेड्यांचा संपर्क असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे शेतकरी व शेतमजूर , विविध कामासाठी येणारे जाणारे नागरीक व विविध रोजगारांसाठी येणाऱ्या मजूरांना थेट जीव मुठीत घेऊन पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे रस्त्यामुळे होत असलेल्या गैरसोयीकडे सार्वजनीक बांधकाम विभाग झोपेचे सोंग घेऊन काना डोळा करीत आहे नागरिकांचे होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाची चुप्पी चर्चेचा विषय ठरत आहे त्यामुळे वाहून गेलेला रस्ता त्वरीत दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे.