• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकी अडवून तिघांना सळई, लाकडी फळ्यांनी मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 17, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

अमळनेरात ५ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) : दुचाकी अडवून पाचही जणांनी तिघांना लोखंडी सळई व लाकडी फळ्यानी मारहाण करून जखमी केल्याची घटना शनिवारी
दि. १५ रोजी सायंकाळी पाच वाजता येथील गांधलीपुऱ्यात घडली. याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षलसिंग नरेंद्रसिंग ठाकूर (रा. रेल्वेस्थानक परिसर, अमळनेर) हा मित्र राजेश खरारे याला घेऊन मोबाईल दुरुस्तीसाठी धुळ्याला गेला होता. अमळनेरला आल्यावर त्यांचा मित्र दुर्गेश सोनवणे भेटला. पाऊस सुरू असल्याने त्याने दोघांना घरी सोडण्याची विनंती केली. म्हणून ट्रिपलसीट त्याला घेऊन गांधलीपुरा भागात त्याच्या घरी गेले. त्यावेळी गरीबनवाब चौकात सलमान खान रफा, आकीबअली सैय्यद, सोहिल शेख सोडेवाला, नवाज खाटीक, एजाज पठाण यांनी मोटरसायकल थांबवून राजेश खरारे व दुर्गेश सोनवणे यांना मागे ओढून खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी दुर्गेश तेथून पळून गेला.

राजेशला मारहाण करीत असताना हर्षल मोटरसायकल काढून पुढे जाऊ लागला. तेव्हा सलमान रफा याने हातातील विट व लोखंडी सळई मारून मोटरसायकलवरून खाली पाडले. सलमानच्या हातात लोखंडी सळई, आकीब याच्या हातात लाकडी फळी, सोहेल व नवाज यांच्या हातात लाकडी काठ्या व एजाज याच्या हातात लोखंडी सळई होती. हर्षलच्या तोंडावर व पायावर मारून जखमी केले. यावेळी राजेशची आई रजनी खरारे व बहीण लक्ष्मी खरारे भांडण आवरायला आले असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली. या भांडणात हर्षलचे २० हजार रुपये पडून नुकसान झाले.

याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात पाचही आरोपींविरुद्ध रस्ता अडवणे, मारहाण, अश्लील शिवीगाळ व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक विकास देवरे, पोलिस कॉन्स्टेबल अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, गणेश पाटील यांनी रविवारी (ता.१६) पहाटे सर्व पाचही आरोपींना अटक केली. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.


 

 

Previous Post

ब्रह्मश्री संस्थेतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम

Next Post

अयोध्येत राम मंदिर बांधल्यामुळेच माझा लोकसभेत पराभव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अयोध्येत राम मंदिर बांधल्यामुळेच माझा लोकसभेत पराभव

अयोध्येत राम मंदिर बांधल्यामुळेच माझा लोकसभेत पराभव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग
1xbet russia

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
जैन कंपनी

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

April 12, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

यावलमध्ये केळी व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon