जळगाव (प्रतिनिधी) : ब्रह्मश्री सकल ब्राह्मण समाजातर्फे रविवार दि. १६ जून रोजी ब्राह्मण समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व शैक्षणिक मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
या वेळी के. सी. इंग्लिश स्कूल येथे समाजातील गरजू मुलांनी शैक्षणिक साहित्य घेतले व करियर विषयक मार्गदर्शनाचा लाभ घेतला. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने मुलामुलींनी समाधान व्यक्त केले. या वेळी या मुलांना शैक्षणिक वाट, शिक्षण पद्धती व करिअर विषयक मार्गदर्शन व माहिती प्रशांत कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष दिपक कुलकर्णी, उल्हास जोशी यांनी दिली.
यावेळी संस्थापक अध्यक्ष अशोक वाघ, कमलाकर फडणीस, प्रकल्प प्रमुख दिपक महाजन, डाँ.निलेश राव, विलास देशमुख, उदय खेडकर, प्रसाद निशानणार व महिला वर्गाने इ. कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.