राज्यसभा खासदार अँड. उज्ज्वल निकम व हरी कृष्ण ग्रुपचे संस्थापक घनश्याम ढोलकिया यांच्या हस्ते भव्य उद्घाटन ; ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्सची घोषणा
जळगाव (प्रतिनिधी) – आज किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीने महाराष्ट्रातील जळगाव शहरात आपल्या ११ व्या विशेष शोरूमचा शुभारंभ केला. जेडीसीसी बँकेसमोर, दीनानाथ वाडी, रिंग रोड येथे उभारण्यात आलेल्या या शोरूमचे भव्य उद्घाटन राज्यसभा खासदार व विशेष सरकारी वकील अँड. उज्ज्वल निकम आणि हरी कृष्ण ग्रुपचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक घनश्याम ढोलकिया यांच्या हस्ते करण्यात आले.

या उद्घाटन सोहळ्यास जैन उद्योग समहू अध्यक्ष अशोक भाऊ जैन, जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे,आ. एकनाथराव खडसे,जळगाव शहराचे महापौर दिपमाला काळे,व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीच्या किरकोळ विक्री विस्तारातील जळगावमधील हे शोरूम महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. उद्घाटनाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी विविध आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. डायमंड ज्वेलरीच्या मेकिंग चार्जेसवर थेट ३५ टक्के, तर गोल्ड ज्वेलरीच्या मेकिंग चार्जेसवर २० टक्के सूट देण्यात येत आहे. तसेच जुन्या सोन्याच्या बदल्यात डायमंड ज्वेलरी खरेदीवर १०५ टक्क्यांपर्यंत मूल्य मिळण्याची ऑफर देण्यात आली आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ‘शॉप अँड विन’
उपक्रमांतर्गत ग्राहकांना कार किंवा स्कूटर जिंकण्याची संधीही देण्यात आली आहे. यासाठी देशभरात लकी ड्रॉ आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय गोल्ड ज्वेलरीवर ‘डबल रेट प्रोटेक्शन’चा लाभ ग्राहकांना घेता येणार असून, केवळ २५ टक्के डाउन पेमेंट भरून दागिन्यांची किंमत सुरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व ऑफर्ससाठी अटी व शर्ती लागू आहेत.
यावेळी हरी कृष्ण ग्रुपचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक घनश्याम ढोलकिया म्हणाले की, सण-उत्सवांच्या काळात दागिने हा आनंदाचा अविभाज्य भाग असतो. जळगावमधील विशेष शोरूमच्या माध्यमातून किसना डायमंड आणि गोल्ड ज्वेलरीचे जग या भागातील ग्राहकांच्या अधिक जवळ आणताना आनंद होत आहे. ‘हर घर किसना’ या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय कुटुंबापर्यंत डायमंड ज्वेलरी पोहोचवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पराग शहा यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील उपस्थिती अधिक मजबूत करण्यासाठी आणि नव्या ग्राहकांशी जोडले जाण्यासाठी जळगाव ही कंपनीसाठी महत्त्वाची संधी आहे. स्थानिक पसंती व सणासुदीच्या परंपरांना अनुरूप डायमंड आणि गोल्ड ज्वेलरीचे विविध डिझाइन्स, आकर्षक ऑफर्स आणि उत्कृष्ट शोरूम अनुभव ग्राहकांना देण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
किसना चे एक्सक्लुझिव्ह ब्रँड आउटलेट भागीदार योगेश अशोक चौधरी, वैभव प्रवीण चौधरी आणि अंकुश राजेंद्र चौधरी यांनी सांगितले की, जळगावमध्ये दागिन्यांची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे. येथील ग्राहक परंपरा आणि आधुनिक शैलीचा सुरेख संगम असलेल्या डिझाइन्सना पसंती देतात. या पार्श्वभूमीवर किसनाचे वैविध्यपूर्ण डायमंड व गोल्ड कलेक्शन, विशेष ऑफर्स आणि ग्राहकांना संस्मरणीय अनुभव देणारी सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
जळगाव शहरातील या नव्या शोरूममुळे ग्राहकांना विविध प्रकारच्या डायमंड व गोल्ड ज्वेलरीचे कलेक्शन एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून, आगामी सणासुदीच्या काळात खरेदीसाठी ग्राहकांना आकर्षक पर्याय मिळणार आहेत.









