पोलन पेठेत दुकान फोडून ६४ हजारांची रोकड लंपास


जळगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव, प्रतिनिधी : शहरातील पोलन पेठ परिसरात अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून ६४ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
पोलन पेठ येथील न्यू कनक फुटवेअर या दुकानाला चोरट्यांनी लक्ष्य केले. दुकानातील ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल तसेच ५००, २०० आणि १०० रुपयांच्या अन्य नोटा, अशी एकूण ६४ हजार रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली.
या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. व्यापारी भागात झालेल्या या चोरीमुळे रात्रीच्या पोलिस गस्तीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.









