जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील मोहन नगरातील वृंदावन गार्डन समोरून एका डॉक्टरांची स्विप्ट कारची चोरी झाल्याची घटना रविवारी ९ जुलै रोजी पहाटे साडे तीनवाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला कारच्या चोरीबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील मोहन नगरातील वृंदावन गार्डन जवळ डॉ. साजीद दगडू तडवी हे आपल्या परिवारासह राहायला आहे. त्यांच्याकडे स्विप्ट कार क्रमांक (एमएच १९ सीयू ०२८०) आहे. गुरूवार ६ जुलै रोजी रात्री डॉ. तडवी यांनी त्यांची कार त्यांच्या घरासमोर आलेल्या झाडाजवळ पार्क करून लावली होती. रविवारी ९ जुलै रोजी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांची कार चोरून नेली. हा प्रकार घडल्यानंतर डॉ. तडवी यांनी कारचा सर्वत्र शोध घेतला परंतू काहीही माहिती मिळाली नाही. यानंतर रविवारी ९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता रामानंदनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.