दोन जणांना अटक; एमआयडीसी पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा
जळगाव प्रतिनिधी) :- शहरातील सिंधी कॉलनी परिसरात एका तरुणावर भरचौकात झालेल्या प्राणघातक चाकू हल्ल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बाबा नगरच्या कंपाऊंडमध्ये गप्पा मारत असलेल्या राहुल खिवलानी या तरुणावर सुनील तडवी आणि सतराज गायकवाड या दोघांनी चाकूने हल्ला केला.

हल्लेखोर विशेषतः रिक्षाने आले होते. आणि त्यांनी महामार्गावरील झुडिओ शोरूमजवळ गाडी थांबवली होती. चालून आलेल्या संशयितांनी राहुलला पकडून “आज तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत त्याच्या छातीवर चाकू चालवला. राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर त्याचे मित्र धावून आले, ज्यामुळे हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. मित्रांनी जखमी राहुलला दुचाकीवरून तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेल्यामुळे त्याचे प्राण वाचू शकले. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींना उशिरा अटक केली असून दोघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








