• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळ (प्रतिनिधी):-आपले परिवार सार्वजनिक वाचनालय, भुसावळ तर्फे साने गुरुजी स्मृती सप्ताह व कर्मयोगी वासुदेव गुरुजी स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘गुणगौरव यशोत्सव – उत्सव गुणवत्तेचा’ व पुरस्कार प्रदान सोहळा ७ जून २०२६ रोजी डॉ. बी. व्ही. खाचणे सभागृह, नंदनवन कॉलनी येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या मान्यवरांना व ४५ गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद सदस्य आमदार एकनाथराव खडसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकीताई पाटील, रावेरचे आमदार अमोल जावळे, लोढा ग्रुपचे (पुणे रिजन) डेप्युटी सी.ई.ओ. तुषार येवले, डॉ. पंकज पाटील, प्रभारी नगराध्यक्षा शैलजाताई नारखेडे, महेशभाऊ फालक, पी. व्ही. पाटील, गणेश नेहते, ललित पाटील, सुहास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कारार्थींचा गौरव व सन्मानवाचनालयाच्या वतीने पुरस्कारार्थींना शाल, कै. गोदावरी पाटील यांचे ’हितगुज’ हे पुस्तक आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्रदान करण्यात आलेले प्रमुख पुरस्कार खालीलप्रमाणे:जीवन गौरव पुरस्कार २०२६: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण घनश्याम पाटील (संस्थापक अध्यक्ष, झुंजार लेवा समाज सांस्कृतिक मंडळ, भुसावळ).कर्मयोगी वासुदेव गुरुजी संघटक गौरव पुरस्कार २०२६: माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळ (तळवेल), स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ (खडका), सकल लेवा महिला मंडळ (भुसावळ), आणि लेवा प्रतिष्ठान (भुसावळ).प्राध्यापक व उपप्राचार्य गौरव पुरस्कार: प्रा. डॉ. सुनील मधुकर नेवे (भालोद कॉलेज) व प्रा. शैलेश रमेश राणे (सरदार जी. जी. हायस्कूल, रावेर).मुख्याध्यापक गौरव पुरस्कार: जयंत रमेश चौधरी (वड्री) आणि डॉ. शिवचरण मधुकर उज्जैनकर (पारंबी).शिक्षक गौरव पुरस्कार: डॉ. विजय काशिनाथ बागुल, ललित अनंत बढे, राजेंद्र गुलाबराव साळी, ज्ञानदेव रघुनाथ धांडे, योगिता ज्ञानदेव झांबरे, हेमांगी अशोक पाटील, संजीवनी संजय यावलकर आणि शुभांगी सुनील सरोदे.युवा गौरव पुरस्कार २०२६: तुषार सुधाकर येवले (लोढा ग्रुप), वैभव किशोर ढाके, विनायक शंकर पाचपांडे, डॉ. लोकेश सुरेश नेहते आणि सतीश घनश्याम महाजन.याशिवाय, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळविणार्‍या ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व पॅड देऊन विशेष गौरव करण्यात आला.
मान्यवरांची मनोगतेअध्यक्षीय भाषणात आमदार एकनाथराव खडसे यांनी कर्मयोगी वासुदेव गुरुजी यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. त्यांच्या कार्यामुळे विवरे गावाने देशाला अनेक रत्ने दिली. त्यांनी जेथे सेवा केली, तेथे कार्याचा सुगंध दरवळला, असे सांगत खडसे यांनी वाचनालयाच्या उपक्रमांचे कौतुक केले व भविष्यातील कार्यासाठी मदतीचे आश्वासन दिले.माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आपल्या आई-वडिलांच्या स्मृती जागवताना भावूक झाले. आई-वडिलांच्या विचारांची प्रेरणा समाजात रुजविणे हाच या पुरस्कारांचा उद्देश आहे. ’चांगलं पाहिलं, बोललं आणि ऐकलं की चांगलंच होतं’ हा गोदावरी आईंचा विचार मानवी जीवनाला दिशा देणारा आहे, असे ते म्हणाले. लोढा ग्रुपचे डेप्युटी सी.ई.ओ. तुषार येवले यांनी प्रतिकूल परिस्थितीतून सी.ई.ओ. पदापर्यंतच्या प्रवासात मित्रांचे लाभलेले सहकार्य महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची वैशिष्ट्येकार्यक्रमाची सुरुवात कु. नुपूर भालेराव हिच्या गणेशवंदनेने झाली. प्रास्ताविक शांताराम पाटील गुरुजी यांनी केले, तर विद्यार्थ्यांतर्फे कु. गुंजन अत्तरदे व पुरस्कारार्थींतर्फे कला शिक्षक राजेंद्र साळी यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित राहणार्‍या प्रत्येक नागरिकाला वाचनालयाचा लोगो असलेला बॅच, ’हितगुज’ पुस्तक व ’गोदावरी’ साप्ताहिकाचा अंक भेट देण्यात आला. आकर्षक रांगोळ्या आणि माहितीपूर्ण भित्तीपत्रकांनी सभागृहाचा परिसर नटला होता.
या यशस्वी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा लोखंडे, नगरसेविका अशा पाटील व येवले यांनी केले. आभार प्रदर्शन शैलेंद्र महाजन यांनी केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रमोद सरोदे, अजय वाघोदे, सतीश ढाके, उदय बोंडे, अनिल फेगडे, पंकज अत्तरदे व अजय पाटील आदींनी परिश्रम घेतले.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

Next Post

भुसावळमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

भुसावळमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जिल्हा कारागृहात कैद्याचा पोलिस रक्षकावर हल्ला; कारागृह प्रशासनात खळबळ

June 9, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
1xbet russia

भुसावळमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

June 9, 2026
भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
1xbet russia

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

June 9, 2026
६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण
1xbet russia

६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

June 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जिल्हा कारागृहात कैद्याचा पोलिस रक्षकावर हल्ला; कारागृह प्रशासनात खळबळ

June 9, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

भुसावळमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

June 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon