• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतात काम करताना विजेचा धक्का लागून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 27, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेतात काम करताना विजेचा धक्का लागून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

जळगाव, ( प्रतिनिधी) :- भुसावळ तालुक्यातील सुसरी शिवारात शेतात काम करताना विजेचा धक्का लागून शेतकरी दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. अशोक बाबूराव पाटील (वय ५५) आणि सरिता अशोक पाटील (वय ४३, रा. सुसरी, ता. भुसावळ) अशी मृतांची नावे आहेत. कांद्याच्या शेतात निंदणीचे काम सुरू असताना खाली पडलेल्या विद्युत तारेशी संपर्क आल्याने ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक पाटील आणि त्यांच्या पत्नी सरिता पाटील हे सोमवारी नेहमीप्रमाणे मजुरांसह शेतात कामासाठी गेले होते. कांद्याच्या पिकात मोठ्या प्रमाणात तण वाढल्याने पती-पत्नी तण काढण्याचे काम करीत होते. दरम्यान, अशोक पाटील यांचा शेतात खाली पडलेल्या विद्युत तारेशी संपर्क आल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. जवळच काम करीत असलेल्या सरिता पाटील यांनाही विजेचा धक्का बसला.

दोघांनाही तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे सुसरी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. विद्युत तार नेमकी कोणत्या कारणाने खाली पडली, याबाबत तपासातून स्पष्टता येणार आहे.

अशोक पाटील आणि सरिता पाटील यांच्या मुलीचा साखरपुडा येत्या १ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. घरात मंगलकार्याची तयारी सुरू असल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, साखरपुड्यापूर्वीच काळाने घाला घातल्याने पाटील कुटुंबाचा आनंद क्षणात नाहीसा झाला.

ज्या घरात काही दिवसांत साखरपुड्याची लगबग सुरू होणार होती, त्याच घरावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगापूर्वीच आई-वडिलांचे छत्र हरपल्याने ग्रामस्थांमधून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुखराम सावकारे करीत आहेत. शेतातील विद्युत तार खाली पडण्यामागील कारण आणि दुर्घटनेची परिस्थिती याबाबत चौकशी सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सुसरी गावावर शोककळा पसरली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

जळगावातील महादेव मंदिराच्या दानपेटीतून चोरी 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात काम करताना विजेचा धक्का लागून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
क्राईम

शेतात काम करताना विजेचा धक्का लागून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 27, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
क्राईम

जळगावातील महादेव मंदिराच्या दानपेटीतून चोरी 

October 27, 2026
मोतीबिंदू मुक्त जळगाव जिल्हा’ अभियान;चोपड्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा प्रारंभ
खान्देश

मोतीबिंदू मुक्त जळगाव जिल्हा’ अभियान;चोपड्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा प्रारंभ

October 26, 2026
कासोदा पोलीस व एरंडोल महसूल विभागाची वाळूमाफियांवर संयुक्त धडक कारवाई
क्राईम

कासोदा पोलीस व एरंडोल महसूल विभागाची वाळूमाफियांवर संयुक्त धडक कारवाई

October 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात काम करताना विजेचा धक्का लागून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

शेतात काम करताना विजेचा धक्का लागून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 27, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगावातील महादेव मंदिराच्या दानपेटीतून चोरी 

October 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon