• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

जळगाव, (प्रतिनिधी):- जळगावातील महादेव हॉस्पिटलने हृदयविकार उपचार क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांच्या टीमने ६५ वर्षीय गंभीर रुग्णावर अत्याधुनिक ड्युअल-चेम्बर परमानेंट पेसमेकरचे यशस्वी रोपण करून त्याला नवजीवन दिले आहे. अत्यंत संवेदनशील व कौशल्यपूर्ण मानली जाणारी ही प्रक्रिया कोणत्याही गुंतागुंतीशिवाय यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.

सदर रुग्ण हृदयाच्या वहन दोषामुळे (कंडक्शन डिसऑर्डर) त्रस्त होता. हृदयाची गती अत्यंत मंद झाल्याने त्याला वारंवार चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे तसेच तीव्र अशक्तपणा जाणवत होता. या गंभीर लक्षणांमुळे त्याच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत होता.

हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्डियोलॉजी विभागाच्या टीमने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया पार पाडली. स्थानिक भूल देऊन ‘मिनिमली इन्व्हेसिव्ह ट्रान्सव्हेनस’ पद्धतीने गळ्याच्या हाडाखालील शिरेमधून दोन पेसिंग लीड्स हृदयाच्या उजव्या अलिंद (राइट एट्रियम) व उजव्या वेंट्रिकलमध्ये अचूकपणे बसविण्यात आल्या. त्यानंतर या लीड्स छातीच्या वरच्या भागात त्वचेखाली बसवलेल्या पल्स जनरेटरशी जोडण्यात आल्या.

हे अत्याधुनिक यंत्र हृदयाच्या विद्युत हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार विद्युत लहरी पाठवते. त्यामुळे हृदयाचे दोन्ही कप्पे योग्य समन्वयाने कार्य करतात आणि हृदयाची गती नियंत्रित राहण्यास मदत होते.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत तातडीने लक्षणीय सुधारणा दिसून आली. हृदयाचे ठोके सामान्य झाल्याने रुग्णाची प्रकृती स्थिर असून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शनासह त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

डॉ. वैभव पाटील म्हणाले की, “कम्प्लीट हार्ट ब्लॉक, हाय-ग्रेड एट्रिओव्हेंट्रिक्युलर (एव्ही) ब्लॉक आणि सिक सायनस सिंड्रोम यांसारख्या गंभीर हृदयविकारांमध्ये ड्युअल-चेम्बर पेसमेकर अत्यंत प्रभावी उपचार ठरतो. वेळेवर निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास अशा रुग्णांना पूर्णपणे सामान्य व सक्रिय जीवन जगता येते. नागरिकांनी वारंवार चक्कर येणे, अचानक थकवा जाणवणे, बेशुद्ध पडणे किंवा नाडीचे ठोके कमी होणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. अशा वेळी तातडीने ईसीजी तपासणी करून हृदयविकार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.”

या यशस्वी प्रक्रियेत डॉ. सहर हमदुले (जनरल सर्जन), डॉ. सैयद झीशान (एस.आर. डीएम कार्डिओलॉजी), डॉ. आकाश पवार (जनरल मेडिसिन) आणि डॉ. केदारनाथ देशमुख (इमर्जन्सी मेडिसिन) यांचे विशेष सहकार्य लाभले.

महादेव हॉस्पिटलच्या या यशस्वी कामगिरीमुळे जळगाव जिल्ह्यात अत्याधुनिक हृदयविकार उपचारांची उपलब्धता अधिक सक्षम झाल्याचे बोलले जात आहे. रुग्णालयाच्या वैद्यकीय टीमच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharatmahadev hospital news
Previous Post

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

Next Post

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जिल्हा कारागृहात कैद्याचा पोलिस रक्षकावर हल्ला; कारागृह प्रशासनात खळबळ

June 9, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
1xbet russia

भुसावळमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

June 9, 2026
भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
1xbet russia

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

June 9, 2026
६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण
1xbet russia

६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

June 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जिल्हा कारागृहात कैद्याचा पोलिस रक्षकावर हल्ला; कारागृह प्रशासनात खळबळ

June 9, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

भुसावळमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

June 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon