मारवड (प्रतिनिधी) : तालुक्यातील कडमसरे शिवारातील एका बिअर शॉपीचे शटर तोडून अज्ञात चोरट्याने रोकड, बिअरचे टिन, काचेच्या बाटल्या तसेच सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण ३६ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडमसरे शिवारातील गट क्रमांक १९९/१ मधील राधिका बिअर शॉपी येथे २४ जून रोजी रात्री १० ते २५ जून रोजी सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर गल्ल्यातील १३ हजार ५०० रुपये रोख, १८ हजार रुपये किमतीचे ५०० मिलीचे १२० बिअर टिन, ३ हजार १२० रुपये किमतीच्या ३३० मिलीच्या २४ बिअरच्या काचेच्या बाटल्या तसेच २ हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण ३६ हजार ६२० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी दुकान मालक राजेंद्र रघुनाथ चौधरी (वय ६२, रा. कडमसरे, ता. अमळनेर) यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) व ३३४ अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. शरीफ खान पठाण हे करीत आहे.









