जळगाव, दोंडाईचा येथे घडला गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एका भागात राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेला फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तीन जणांनी नैसर्गिक व अनैसर्गिकरित्या अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी रविवारी दि. २३ जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका भागात २७ वर्षीय महिला ही कुटुंबासह वास्तव्याला आहे. सदर महिला दोंडाईचा येथे काकाच्या मुलीच्या लग्नात गेली असताना तेथे कपडे बदली करीत असताना महिलेचा चुलत भाऊ व संशयित आरोपी सचिन किशोर भाट (रा. नंदुरबार) याने चोरून तिचा विडिओ व फोटो काढला. त्यानंतर महिलेला फोटो दाखविले. महिलेने फोटो डिलीट कर, म्हणून सांगितले. मात्र, मी तुला जळगावला भेटायला येईल म्हणून संशयिताने सांगितले. त्यांनतर वेळोवेळी त्याने तिच्यासोबत पाच ते सहा वेळा व्हिडीओ व फोटो दाखवून जळगाव येथील घरात, पायघन हॉस्पिटलच्या मागील बिल्डिंग बांधकामाच्या ठिकाणी, दोंडाईचा शहरात जबरदस्तीने शारीरिक संबंध बनविले.
याशिवाय पाळधी गावापुढच्या जंगलातहि महिलेला फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन संशयित सचिन भाट याने व त्याचा मित्र निलेश युवराज तमाईचे (रा. नंदुरबार) अशा दोघांनी मिळून महिलेवर नैसर्गिक व अनैसर्गिक संभोग करून अत्याचार केला. तसेच, दि. ६ जून रोजी दोंडाईचा शहरात नंदुरबार रोडवरील एका पत्र्याच्या खोलीत संशयित आरोपी सचिन भाट व त्याचा मित्र बंटी दीपक नेतले (रा. दोंडाईचा जि. धुळे) यानेही महिलेवर नैसर्गिक व अनैसर्गिक संभोग केला. अखेर कंटाळून सदर महिलेने घाबरून पती व कुटुंबियांना हि घटना सांगितली. सदर प्रकार हा दि. ४ डिसेम्बर २०२२ ते ६ जून २०२४ च्या दरम्यान घडला आहे. दरम्यान हा प्रकार तिला सहन न झाल्याने थेट एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार रविवार २३ जून रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी सचिन किशोर भाट रा. नंदुरबार, बंटी दीपक नेतले रा. दोंडाईचा आणि निलेश युवराज तमाईचे रा. नंदुरबार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे करीत आहे.