• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 22, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!

जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

जळगाव ( प्रतिनिधी ) – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी यांच्या बँक लॉकरची झडती घेतली असता, तब्बल १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात आणि सहकार वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

लाच प्रकरणात झाली होती अटक
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावचे सहकार विभाग वर्ग-१ चे उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी (वय ५६, रा. शांती नगर, यावल रोड, भुसावळ) यांच्यावर दिनांक २० मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा रचून कारवाई केली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ व १२ प्रमाणे गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपी जगदीश बारी २३ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडीत आहेत.
घरझडतीतून लागला लॉकरचा सुगावा
गुन्हा दाखल झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने आरोपी जगदीश बारी यांच्या घराची झडती घेतली. या घरझडती दरम्यान बारी यांचे भुसावळ येथील कॉसमॉस बँकेत लॉकर असल्याची माहिती अधिकार्‍यांना मिळाली. त्यानुसार २२ मे २०२६ रोजी दोन पंचांसमक्ष या लॉकरची कसून झडती घेण्यात आली.
लॉकरमध्ये काय काय मिळाले?
लॉकर उघडल्यानंतर एसीबीच्या अधिकार्‍यांना खालील मुद्देमाल आढळून आला, जो जप्त करण्यात आला आहे:
सोन्याचे दागिने: ९९,०४,९६० रुपये किमतीचे ६६०.३३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे हार, बांगड्या आणि सोन्याची बिस्किटे.
रोख रक्कम: ८,३६,५०० रुपये रोख (सर्व ५०० रुपयांच्या नोटा).
चांदीचे दागिने: २,६२५ रुपये किमतीचे १०.५०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने.
एकूण जप्त मुद्देमाल: १,०७,४४,०७५/- रुपये (१ कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपये).

या पथकाने केली कारवाई
नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्यासह लॉकर झडती पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, महिला पोलीस अंमलदार संगीता पवार, प्रदीप पोळ, मनोज पाटील, अमोल सूर्यवंशी आणि चंद्रशेखर चौधरी यांनी ही यशस्वी कारवाई केली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी

Next Post

नैराश्याविरुद्धची लढाई जिंकली; दोन भावांच्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नैराश्याविरुद्धची लढाई जिंकली; दोन भावांच्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य

नैराश्याविरुद्धची लढाई जिंकली; दोन भावांच्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत
1xbet russia

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

July 10, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार
1xbet russia

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

July 10, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

प्लॉट विक्रीच्या व्यवहारात महिलेची १३ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक

July 10, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

फैजपूरमध्ये प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई; पानटपरी चालकाला अटक

July 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

July 10, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

July 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon