यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वढोदे या गावात एका कृषी क्रेंद्रावर तर यावल शहरातील विरार नगर व मदीना नगर या परिसरात अशा तीन ठिकाणी अज्ञात चोरटयांनी घरफोडी केल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्हीच्या आधारे एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल शहरातील हरिओम नगर शेजारी मदीना नगर परिसरात राहणारे रफीक खान नामदार खान (वय ५५ वर्ष) एका खाजगी शाळेत शिपाई म्हणुन नोकरीस असुन यांनी शहरातील विस्तारित क्षेत्रात आपल्या सुन व मुलासाठी भाडे तत्यावर घर घेतले असुन १ नोव्हेंबर ते २ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास घरातील मंडळी ही बाबुजीपुरा येथील घरात झोपण्यासाठी गेले असता, अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून घरातील लाकडी कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. दुसऱ्या एका घटनेत शहरातील विस्तारित भागातील विरारनगर या ठीकाणी राहणाऱ्या पुष्पा विजय अहिरराव यांच्या देखील घरचा कुलुप तोडून रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
यावल शहरातीच राहणारे माजी नगराध्यक्ष दिपक रामचंद्र बेहेडे यांच्या वढोदे तालुका यावल या ठिकाणी असलेल्या कृषि केंद्राला देखील लक्ष केले व कृषी केंद्राच्या मुख्य दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश करून सुमारे १० ते २oहजार रुपये किमतीचे कृषी साहीत्य चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. सदर कृषी केंद्रातील चोरीचा प्रकार हा सिसिटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
यावल पोलीस ठाण्यात या तिघांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक राजेन्द्र साळुंके व पोलीस करीत आहे. दरम्यान यावल पोलीसांनी चोरीच्या गुन्ह्यात विरारनगर या परिसरात काल रात्रीच्या सुमारास मध्य प्रदेशातील एका अज्ञात चोरट्यास संशयीत म्हणुन अटक केली आहे.