• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

फरार ड्रग्ज पेडलर परराज्यात पळाल्याचा संशय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 14, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
फरार ड्रग्ज पेडलर परराज्यात पळाल्याचा संशय

संशयितांच्या शोधार्थ एलसीबीचे पथक रवाना; अटकेतील आरोपींची कारागृहात रवानगी

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कारमधून ड्रग्जची विक्री करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) पर्दाफाश केल्यानंतर अटक केलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील दोन मुख्य ड्रग्ज पुरवठादार अद्याप फरार असून ते परराज्यात पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांच्या शोधासाठी एलसीबीचे विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.

एलसीबीच्या पथकाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या कारवर छापा टाकून ड्रग्ज विक्रीचा प्रकार उघडकीस आणला होता. या कारवाईत रईस देशमुख, तौसिफ सैय्यद आरिफ आणि कृणाल उर्फ लकी पाटील यांच्याकडून सुमारे ६ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

अटकेतील आरोपींच्या चौकशीत ड्रग्ज पुरवठा साखळीबाबत धक्कादायक माहिती समोर आली. रईस देशमुख याने अमदज उर्फ बिल्डर शेख (फातेमा नगर), तौसिफ आरिफ याने इम्रान उर्फ इम्मा हसन हुसेन भिस्ती (शाहूनगर) आणि कृणाल उर्फ लकी पाटील याने अन्वर पटेल (सुप्रीम कॉलनी) यांच्याकडून विक्रीसाठी ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली.

या माहितीच्या आधारे एलसीबीने बोरनार येथील अन्वर पटेल याला अटक केली. मात्र अमदज उर्फ बिल्डर शेख आणि इम्रान उर्फ इम्मा हसन हुसेन भिस्ती हे दोघे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मध्यप्रदेश, सुरत, पुणे आणि मुंबई येथे शोधमोहीम राबविली. मात्र दोघांचाही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे हे संशयित राज्याबाहेर पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यांच्या अटकेसाठी एलसीबीचे पथक विविध ठिकाणी रवाना करण्यात आले आहे. पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार

Next Post

रावेरमधील हॉटेलमध्ये तरुणास बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त

रावेरमधील हॉटेलमध्ये तरुणास बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून
1xbet russia

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

September 15, 2026
गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

September 15, 2026
गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon