धरणगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील नांदेड गावात रस्त्यालगत असणारी तीन रास ९ हजार रुपये किमतीची वाळू एकाने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून एका विरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील उघड वाडी येथील पोलीस पाटील वाल्मीक आत्माराम पाटील ( वय-३४ ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की गणू जगन्नाथ भोई रा. नांदेड तालुका धरणगाव याने धुरखेडा रस्त्यावरील नांदेड गावात रस्त्यालगत असणारी नऊ हजार रुपये किमतीची तीन ब्रास वाळू २३ जुलै रोजी चोरली म्हणून धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक चंदुलाल सोनवणे करीत आहे.