भुसावळ ( प्रतिनिधी ) – येथील एका परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीला अश्लील व्हिडिओ पाठवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की भुसावळ शहरातील एका परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीला २२ जुलै च्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास आरोपी गोपाळ गणेश नवले याने अश्लील व्हिडिओ पाठवून तरुणीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी गोपाळ नवले याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेश चौधरी करीत आहे.