पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातून एका गावातून एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तालुक्यातील मोहाडी गावात राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलगी २२ जुलै रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तिला कुठले तरी आमिष दाखवून फुस लावून पळून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिल्यावरून आरोपी विरुद्ध पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक शैलेश चव्हाण करीत आहे.