जळगाव : महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भगवान बिरसा मुंडा हे ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करत आदिवासी समाजाचे हक्क, जल–जंगल–जमिनीवरील अधिकार आणि सांस्कृतिक अस्मितेच्या रक्षणासाठी लढा देणारे महान जननायक होते, असे गौरवोद्गार मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी काढले. यावेळी परिमंडल व मंडल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कॅप्शन : महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात बिरसा मुंडा यांना अभिवादन करताना मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी.








