भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथील वस्तुस्थिती
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथे महानिर्मिती प्रकल्पामध्ये माजी सैनिक, त्यांच्या विधवा पत्नी व त्यांचे पाल्य हे कॉन्ट्रॅक्टर कामगार म्हणून सुरक्षा विभागात आहेत. मात्र यांना फॅक्टरी अॅक्ट नुसार भत्ते मिळत नसल्यामुळे त्यांनी बुधवार दिनांक १९ जूनपासून राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसच्या माध्यमातून साखळी उपोषण सुरू केले आहे.
सुरक्षा विभागातील निविदेत तातडीने परिपत्रक आदेशप्रमाणे भत्ते समाविष्ठ करावे तसेच संदर्भिय बैठकीनुसार आपण सुरक्षा विभागातील कंत्राटी कामगारांच्या भत्यांबाबत वरीष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेवू असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र अद्याप पर्यंत याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
पत्रातील संदर्भ ५ मधील मेस्को कंपनीच्या वेज स्ट्रक्चरशी आमचा कुठलाही संबंध नसून सदर कंपनी आता महानिर्मिती महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत काम करीत असल्याने त्यांनी महानिर्मितीच्या नियम/कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे, असे उपोषणकर्त्या नागरिकांनी सांगितले.