पंचायत समिती असोसिएशनची बैठकीत मागणी
रावेर (प्रतिनिधी) :- जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती सदस्य असोसिएशनची जळगांव जिल्हा बैठक साने गुरुजी सभागृह, जिल्हा परिषद, जळगांव येथे गुरुवारी दि. ८ रोजी पार पडली. बैठकीत ऑपरेशन सिंदूर राबवल्या द्दल भरीत्या सैन्य दलाचे अभिनंदनाचा ठराव केला.
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला व निवडणुक आयोगाला येत्या ४ महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका १९९४-२०२२ ची ओ.बी.सी. आरक्षणाच्या स्थिती नुसार घेण्याचे आदेश केले आहेत. या निर्णयाचे देखील स्वागत करण्यात आले. सदरच्या बैठकीस प्रभाकर नारायण सोनवणे, रामदास गोंडु पाटील, नरेंद्र गेंदराज पाटील, मधूकर काटे, मनोहर गिरधर पाटील, डॉ.कमलाकर पाटील, माधुरी चंद्रशेखर अत्तरदे, प्रतिभा तुकाराम बोरोले, तुकाराम बोरोले, रवींद्र सूर्यकांत पाटील, गोपाल पाटील, नानाभाऊ पोपट महाजन, रवींद्र पाटील उपस्थित होते.