जळगाव ; – मेहरूण परिसरातील एका नागरिकाची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली असून परिसरातील जनतेत धास्तीचे वातावरण आहे. गेल्या अनेक दिवसापासून राज्यात आणि देशात संचार बंदी सुरु आहे परंतु याचे गाम्भीर्य जनतेने समजावून घेतलेले नव्हते परंतु मेहरूण परिसरातील एका नागरिकाची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली तेव्हा पासून प्रत्येक व्यक्ती मध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे . जिल्हाधिकारी यांनी सांगीतीतले आहे कि घाबरून न जाता आपण आपली काळजी घ्या . जनता मात्र घरातून बाहेर जाण्याचे थांबवत नसल्याने आता जळगाव शहरातील प्रत्येक कॉलोनी मधील येणारे रस्ते नागरिक बंद करीत आहे . हे आधीच करायला पाहिजे होते . असे अनेकांचे म्हणणे आहे . मेहरूण परिसातलं रामेश्वर कॉलोनी. हुडको यासहा अनेक भागात हा प्रयोग करण्यात येत आहे .हळूहळू सर्व शहरातील कॉलोनी मधील चौक बंद होतील .त्यामुळे आता १०० टक्के संचार बंदी आणि लॉकडाऊन होणार असे वाटायला लागले आहे