जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे स्वागतासाठी ‘नेक्सस२के २६’ हा फ्रेशर्स सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.गौरव भोई यांची मि.फ्रेशर्स तर कुमदिनी महाजन यांची मिस फ्रेशर्स म्हणून निवड करण्यात आली.
सुरुवात गोदावरी फाउंडेशनचे सदस्य, प्रख्यात न्यूरोसर्जन, डॉ. अनिकेत पाटील, प्रमुख पाहुणे मोटर वेहिकल इन्स्पेक्टर, जळगाव आरटीओ तथा गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे २०१४ बॅचचे माजी विद्यार्थी निलेश पाटील, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचे हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, अधिष्ठाता, प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. प्रमुख पाहुणे निलेश पाटील यांनी आपल्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या काळातील आठवणींना उजाळा देत प्रथम व द्वितीय वर्षात योग्य निर्णय घेण्याचे महत्त्व, सातत्याने स्वतःच्या कौशल्यांमध्ये वाढ करणे, वेळेचे योग्य नियोजन आणि विविध छंद जोपासणे याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच व्यावसायिक जीवनात सॉफ्ट स्किल्स आणि व्यावसायिक कौशल्यांचे महत्त्व त्यांनी विशद केले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी महाविद्यालय सदैव त्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
फ्रेशर्स पार्टीच्या मनोरंजनात्मक सत्राला सुरुवात झाली. प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजक उपक्रम आणि सादरीकरणांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,गौरव इंगळे, जिज्ञासा पाटील, संकेत बागड, सोनम गुंजाळ, मोहित चौधरी, रिद्धी भिरूड, राजश्री यादव, लल्लेश पाटील, निखिल पाटील, प्रणाली पाटील, ऋषिकेश पाटील, स्नेहल पाटील, हितेश चौधरी, मोहिनी जोशी, दिया चौधरी, चेतन चौधरी आणि आदेश जैस्वाल यांनी केले. संगणक अभियांत्रिकीचा गौरव भोई मिस्टर फ्रेशर – तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशनची कुमुदिनी महाजन मिस फ्रेशर विजेते ठरले यशस्वीतेसाठी प्रथम वर्ष विभागाचे प्रमुख डॉ. नितीन भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक वर्ग यांनी नियोजन केले.आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) यांनी कौतुक केले.










