मुक्ताईनगरमधील जाहीर सभेत दिले आश्वासन
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवार श्रीराम पाटील यांना मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे यांनी दिले.
महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ मुक्ताईनगर येथे पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. यावेळी रोहिणी खडसे सभेत बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार राजेश एकडे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ सतीश पाटील, माजी आमदार अरुण पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार कैलास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पाटील, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शिवसेना उबाठा गट संपर्क प्रम्मुख संजय सावंत यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. रोहिणी खडसे बोलताना पुढे म्हणाल्या की, मला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची विचारधारा भावते. म्हणून मी राष्ट्रवादीत राहण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना मुक्ताईनगरमधून लीड मिळवून देणार हि माझी गॅरंटी आहे असे सांगितले. लीड कमी झाले तर ती माझी जबाबदारी असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.