जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील प्रकार ; सदस्याने सुरु केले आमरण उपोषण
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथे नुकतीच ग्रामपंचायत सरपंचाची निवड झाली. या निवडीत उषाबाई पाटील यांनी खोटे जात प्रमाणपत्र दिल्याचे जळगाव व धुळ्यातील समितीने लिखित दिल्यावरीही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने ग्रामपंचायत सदस्य नितीन बुधे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे.
जळगाव तालुक्यातील शिरसोली या ठिकाणी नुकतीच सरपंच पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये पाटील उषाबाई भिमराव पाटील यांनी ओबीसी कुणबी जातीचे प्रमाणपत्र सादर करून ते धुळे समितीकडून वैध करून आणण्याचे दाखविले व सरपंचपदी विराजमान झाल्या. याबाबत ग्रामपंचायत सदस्य नितीन बूधे यांनी जात प्रमाणपत्र बाबत तक्रार केली असता सदरील हे प्रमाणपत्र खोटे असल्याचे निष्पन्न झाले.
मात्र संबंधित व्यक्तीवर आजपर्यंत कोणतेही कारवाई करण्यात आलेले नाही म्हणून ग्रामपंचायत सदस्य हे उपोषणाला बसले आहे. पाटील उषाबाई भिमराव यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रचा व्हीसी नंबर 20 24 -0010 81560 प्रमाणपत्र क्रमांक 33 54 या नावाचे त्यांनी जात प्रमाणपत्र दिले. याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती घेतली असता ऑनलाइन मध्ये व्हीसी नंबर 20 24 -0010 81560 प्रमाणपत्र क्रमांक 3354 येथे प्रमाणपत्र जगताप सुरज राजू यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले.याबाबत ग्रामपंचायत सदस्य नितीन बुधे यांनी जळगाव जात प्रमाण समिती व धुळे जात प्रमाण समितीकडे माहितीचा अधिकार टाकून याबाबत विचारणा केली.
या क्रमांकावर पाटील उषाबाई भीमराव या नावाचे कोणतेही जात वैध प्रमाणपत्र या कार्यालयातून निर्गमित करण्यात आलेले नाही. याबाबत ग्रामपंचायत सदस्य नितीन बुधे यांनी जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी तहसीलदार यांना निवेदन दिले. मात्र अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई न झाल्यामुळे त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. तरी खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या व शिरसोलीच्या विद्यमान सरपंच उषाबाई भीमराव पाटील यांच्यावर कारवाई व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे.