भुसावळ स्टेशनचा केला निरिक्षण दौरा
भुसावळ (प्रतिनिधी) : – मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांनी भुसावळ येथील एमओएच व रेलवे हॉस्पिटलची शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी पाहणी दौरा केला. तसेच, पुष्पक एक्स्प्रेसने इगतपुरी-भुसावळ दरम्यान सुरू असलेल्या कामाचा विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे यांच्यासमवेत तपासणी वाहनाद्वारे आढावा घेतला. मनमाड-जळगाव तिसर्या मार्गावरील काम, विभागातील प्रवासी सुविधांसंदर्भातील कामांची माहिती घेतली.
रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली हि विभागीय रुग्णालय, भुसावळ आणि विभागातील सर्व आरोग्य युनिटमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. विभागीय रुग्णालय, भुसावळ हे मध्य रेल्वे विभागातील पहिले रुग्णालय आहे. जेथे ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आली आहे. रुग्णाचा सर्व वैद्यकीय इतिहास जसे की पूर्वीचे उपचार, प्रयोगशाळा आणि रेडिओलॉजिकल अहवाल, संदर्भ इत्यादी आता एका क्लिकवर उपलब्ध आहेत. भुसावळमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित केल्यास प्रशासन व उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना याचा फायदा होणार आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांच्या हस्ते आज या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.
शेड क्र. २, ३ बाय ६५ मीटर आणि शेड क्र. ४ चा विस्तार २० मीटर, शेड क्रमांक ४ मधील पिट लाइन २० मीटरने विस्तारणे आणि २ नव्याने बांधलेल्या इमारतींचे उद्घाटन हे इलेक्ट्रिक लोको शेड, भुसावळ येथे महाव्यवस्थापक यांनी केले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इती पांडे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) कौशलेंद्र कुमार आणि भुसावळ विभागातील सर्व शाखांचे अधिकारी, रुग्णालय व इलेक्ट्रिक लोको शेडचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.