• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

भावाच्या शालकाचा चाकूने भोसकून खून; आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर

पाचोरा, (प्रतिनिधी) : पाचोरा शहरात घरगुती आणि मालमत्तेच्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. दीपक प्रकाश कानडे (वय ४४, रा. पाचोरा) यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी संतोष कानडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेमागे दीर्घकाळापासून सुरू असलेले कौटुंबिक वाद कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक कानडे यांच्या बहिणीचा विवाह आरोपी संतोष कानडे यांच्या भावासोबत झाला होता. मात्र संतोष याचा भाऊ मृत झाल्यानंतर संतोष आणि त्याची भावजई यांच्यात विविध कारणांवरून घरगुती वाद सुरू होते. या वादातून दोन्ही कुटुंबांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सोमवारी हा वाद थेट पाचोरा पोलिस ठाण्यात पोहोचला. यावेळी संतोष कानडे यांच्या आई-वडिलांनी दीपक कानडे व त्यांच्या बहिणीवर मारहाणीचे आरोप करत तक्रार दिली. त्याचवेळी दीपक कानडे व त्यांच्या बहिणीनेही आपल्यालाही मारहाण झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदविली. त्यामुळे दोन्ही बाजूंतील वाद अधिकच चिघळल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास दीपक कानडे हे जामनेर रोड परिसरातून जात असताना संतोष कानडे याने त्यांना अडवून धारदार हत्याराने मानेवर वार केला. या अचानक झालेल्या हल्ल्यात दीपक गंभीर जखमी झाले. घटनास्थळी मोठी धावपळ उडाली असून नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरविली. प्राथमिक तपासात घरगुती व मालमत्तेच्या वादातूनच ही रक्तरंजित घटना घडल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे, घटनेनंतर आरोपी संतोष कानडे याने पळ काढण्याचा प्रयत्न न करता स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या घटनेमुळे पाचोरा शहरात हळहळ व्यक्त होत असून कौटुंबिक वादाने घेतलेल्या हिंसक वळणाबद्दल नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मृताच्या नातेवाईकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा विविध अंगांनी सखोल तपास सुरू आहे.


 

 

Previous Post

कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

Next Post

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

धक्कादायक! जळगावात 'खिचडी' न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आईसोबतच्या मैत्रीच्या संशयातून. रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने भोसकून हत्या
1xbet russia

आईसोबतच्या मैत्रीच्या संशयातून. रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने भोसकून हत्या

September 11, 2026
मागील भांडणाच्या कारणावरून मित्रावर चाकूने हल्ला; तरुणाचा मृत्यू
1xbet russia

मागील भांडणाच्या कारणावरून मित्रावर चाकूने हल्ला; तरुणाचा मृत्यू

September 10, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

कजगाव-पारोळा रस्त्यावर भीषण अपघात; रस्ता समतलीकरण यंत्राच्या धडकेत ४३ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

September 10, 2026
भडगावात संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात
1xbet russia

भडगावात संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात

September 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आईसोबतच्या मैत्रीच्या संशयातून. रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने भोसकून हत्या

आईसोबतच्या मैत्रीच्या संशयातून. रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने भोसकून हत्या

September 11, 2026
मागील भांडणाच्या कारणावरून मित्रावर चाकूने हल्ला; तरुणाचा मृत्यू

मागील भांडणाच्या कारणावरून मित्रावर चाकूने हल्ला; तरुणाचा मृत्यू

September 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon