• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

रामानंदनगर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल, संशयित आरोपी अटकेत

जळगाव (प्रतिनिधी) -जळगाव शहरातील शाहूनगर भागात एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. केवळ खाण्यासाठी मागितलेली ‘खिचडी’ दिली नाही, याच एका क्षुल्लक कारणाचा राग मनात धरून एका विकृत प्रवृत्तीच्या नराधमाने ४० वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात सिमेंट काँक्रीटचा मोठा दगड घालून त्याचा निर्घृण खून केल्याची थरारक घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली व्यक्ती जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

खिचडी नाकारल्याने भडकला राग; डोक्यात घातला सिमेंटचा मोठा दगड

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मयत जीवन शालिक पाथरकर (वय ४० वर्षे, मूळ रा. रोटवद, ता. जामनेर, जि. जळगाव, ह.मु. शाहूनगर, जळगाव) हे ८ जून २०२६ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील शाहूनगर येथील एका मोकळ्या जागेत हजर होते. याच वेळी त्या ठिकाणी गावातीलच संशयित आरोपी अंकुश नथ्थू पाटील (वय ४६, रा. समता नगर, जळगाव) हा आला. संशयित अंकुश याने जीवन पाथरकर यांच्याकडे खाण्यासाठी खिचडी मागितली. मात्र, जीवन यांनी त्याला खिचडी देण्यास नकार दिला. आपल्याला खिचडी खाण्यास दिली नाही, या गोष्टीचे संशयित अंकुशला प्रचंड वाईट वाटले आणि त्याचा राग अनावर झाला. याच रागाच्या भरात त्याने बाजूला पडलेला सिमेंट काँक्रीटचा जड दगड उचलला आणि थेट जीवन यांच्या डोक्यात घातला. हा वार इतका भीषण होता की, गंभीर दुखापत होऊन जीवन यांचा जागीच मृत्यू झाला.

भाच्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल; पोलिसांची रात्रीच कारवाई

या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच मयताचा भाचा तुषार राजेंद्र सुतार (वय २८, व्यवसाय- मजुरी, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरूण, जळगाव) याने तातडीने रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून ८ जून २०२६ रोजी रात्री ११:५६ वाजता रामानंदनगर पोलिसांत गुन्हा संशयित आरोपी अंकुश नथ्थू पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्परता दाखवत संशयित आरोपीला अटक केली आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून जळगाव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि जळगाव भागचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि तपासाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना दिल्या.

रामानंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) संदीप पाटील या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.


 

 

Previous Post

पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

Next Post

अमळनेर-धुळे महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अमळनेर-धुळे महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

अमळनेर-धुळे महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत बारी समाज विद्यालयाची भव्य आषाढी एकादशी दिंडी; विठ्ठल नामाच्या गजराने गाव दुमदुमले
1xbet russia

शिरसोलीत बारी समाज विद्यालयाची भव्य आषाढी एकादशी दिंडी; विठ्ठल नामाच्या गजराने गाव दुमदुमले

July 26, 2026
विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात
जैन कंपनी

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 25, 2026
‘बोलवा विठ्ठल’  मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना
जैन कंपनी

‘बोलवा विठ्ठल’  मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना

July 25, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय परिसरात चिमुकले विठठल नामात झाले दंग
1xbet russia

कापडावर साकारली विठ्ठल-रखुमाईची प्रतिमा ; आषाढी एकादशी उत्साहात साजरी

July 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत बारी समाज विद्यालयाची भव्य आषाढी एकादशी दिंडी; विठ्ठल नामाच्या गजराने गाव दुमदुमले

शिरसोलीत बारी समाज विद्यालयाची भव्य आषाढी एकादशी दिंडी; विठ्ठल नामाच्या गजराने गाव दुमदुमले

July 26, 2026
विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon