• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धक्कादायक : पैशांच्या कारणावरून मित्राने हत्या करून मृतदेह पूर्णा नदीपात्रात फेकला !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 19, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
धक्कादायक : पैशांच्या कारणावरून मित्राने हत्या करून मृतदेह पूर्णा नदीपात्रात फेकला !

मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड शिवारातील घटना ; मयत तरुण जळगावचा, ९ तासांनी सापडला मृतदेह

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील तरुणाचा आर्थिक कारणावरून त्याच्याच मित्राने मुक्ताईनगर शिवारातील डोलारखेडा भागात कुंड परिसरात निर्घुण खून करून मृतदेह नदीपात्रात फेकल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि. १९ जुलै रोजी पहाटे उघडकीस आली आहे. दरम्यान नदीपात्रात शोधमोहीम घेतल्यानंतर तब्बल ९ तासांनी त्याचा मृतदेह हात पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/07/VID-20240719-WA0008.mp4

मयत नितीन पाटील याचा मृतदेह पूर्णा नदीपात्रातून काढतांना

नितीन साहेबराव पाटील (वय २५, रा. कला वसंत नगर, असोदा रोड, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, मोठा भाऊ यांच्यासह राहत होता. काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे रेल्वेत अप्रेंटीशीप करून तो जळगावात परतला होता. (केसीएन)नितीनचे वडील हे हार्डवेअरच्या दुकानात मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, नितीन पाटील याच्या एका मुक्ताईनगर येथील मित्राने त्याच्याकडून १ लाख रुपये उसनवारीने घेतले होते.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/07/VID-20240719-WA0009.mp4

मयत नितीन पाटील याची हत्या ज्या ठिकाणी झाली त्याची पाहणी करतांना पोलीस पथक

उसनवारीने घेतलेले पैसे नितीन पाटील हा सारखा त्याच्या मित्राला मागायचा. मात्र नितीन पाटीलचा हा तगादा त्याच्या मित्राला आवडला नाही. (केसीएन) त्यामुळे संशयित आरोपी याने गुरुवारी दि. १८ जुलै रोजी नितीन पाटील याला मुक्ताईनगर येथे बोलावून घेतले. “इकडे ये पैसे घेऊन जा आणि एका कार्यक्रमाला जायचे आहे, तिकडे आपण जाऊ” असे सांगून संशयित आरोपीने नितीन पाटीलला बोलावून घेतले. त्यानंतर डोलारखेडा शिवारात नेऊन तेथे काही मित्रांच्या मदतीने त्याचा खून करून मृतदेह हात पाय बांधून पूर्णा नदी पात्रात फेकून दिला.

दरम्यान, त्याचा संपर्क होत नसल्याने त्याचे कुटुंबिय हे मुक्ताईनगर पोलीस स्थानकात आले. याप्रसंगी नितीन पाटील यांच्यासोबत असणारा एक युवक देखील पोलीस स्थानकात आला. या तरूणाने काही जणांनी नितीनला कुंड गावाजवळच्या जंगलात मारून त्याचा मृतदेह पुर्णा नदीच्या पात्रात टाकून दिल्याचे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी माहिती देणार्‍या तरूणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अन्य आरोपींचा सहभाग असून त्याचा तपास देखील सुरू आहे.

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला ही माहिती कळताच त्यांनी शुक्रवारी पहाटे २ वाजेपासून पूर्णा नदीपात्रात मृतदेहाचा शोध घ्यायला सुरुवात केली. तब्बल ९ तासांनी त्यांना मयत नितीन पाटील यांचा मृतदेह हात पाय बांधलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेह मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.(केसीएन)त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. घटने प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी “केसरीराज”ला दिली. दरम्यान या घटनेमध्ये संशयित आरोपी याला अटक करण्यात आली आहे. खूनाच्या घटनेमुळे मुक्ताईनगर हादरले असून नितीन पाटीलच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


 

 

Tags: #crime#jalgaonmktainagarmuktainagar
Previous Post

मुक्ताईनगरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त संत मुक्ताई मंदिरात गर्दी

Next Post

वाघूर विभागाचे कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन यांच्यावर कारवाई करावी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वाघूर विभागाचे कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन यांच्यावर कारवाई करावी

वाघूर विभागाचे कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन यांच्यावर कारवाई करावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक : किरकोळ वाद उठला जीवावर, डोक्यात पावडा मारून इसमाचा खून..!
क्राईम

धक्कादायक : किरकोळ वाद उठला जीवावर, डोक्यात पावडा मारून इसमाचा खून..!

November 9, 2026
जळगाव शहरातील खेडी शिवारात १०८ रुग्णवाहिकेला अचानक आग
क्राईम

जळगाव शहरातील खेडी शिवारात १०८ रुग्णवाहिकेला अचानक आग

November 9, 2026
चाळीसगाव तालुक्यातून ६० हजारांची दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

चाळीसगाव तालुक्यातून ६० हजारांची दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

November 9, 2026
भडगावात वाळूमाफियांचे धुमशान; गोळीबारात वाळू व्यावसायिक पुढारी जखमी
क्राईम

भडगावात वाळूमाफियांचे धुमशान; गोळीबारात वाळू व्यावसायिक पुढारी जखमी

November 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धक्कादायक : किरकोळ वाद उठला जीवावर, डोक्यात पावडा मारून इसमाचा खून..!

धक्कादायक : किरकोळ वाद उठला जीवावर, डोक्यात पावडा मारून इसमाचा खून..!

November 9, 2026
जळगाव शहरातील खेडी शिवारात १०८ रुग्णवाहिकेला अचानक आग

जळगाव शहरातील खेडी शिवारात १०८ रुग्णवाहिकेला अचानक आग

November 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon