अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजसमोरील खेडी शिवार परिसरात आज दि. ९ दुपारी १२:४५ वाजेच्या सुमारास १०८ रुग्णवाहिकेला अचानक आग लागल्याची घटना घडली. सोहेल पाटील यांनी अग्निशमन विभागाला याबाबत माहिती दिली.
सदर रुग्णवाहिका गॅरेजमध्ये कामासाठी आणली असताना अचानक आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यास मदत झाली.


या अग्निशमन मोहिमेत मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे, केंद्रप्रमुख अधिकारी भारत बारी, वाहनचालक देविदास सुरवाडे तसेच फायरमन नितीन ससाणे आणि खुशाल सपकाळे यांनी आग विझविण्यासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.








