• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुक्ताईनगरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त संत मुक्ताई मंदिरात गर्दी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 18, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
मुक्ताईनगरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त संत मुक्ताई मंदिरात गर्दी

दर्शनासाठी वारकरी व भाविकांची दिवसभर रीघ

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : आदिशक्ती श्री संत मुक्ताई पालखी सोहळा दि. १८ जून रोजी श्रीक्षेत्र मुक्ताईनगर ते श्रीक्षेत्र पंढरपूर, मुक्ताई जुने मंदिर कोथळी येथून हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने पंढरपूर येथे पोहोचला होता. या पालखी सोहळ्यामध्ये असंख्य वारकरी, भाविक, दिंडी सोहळ्यातील भक्तिमय वातावरणाने हरखून गेले होते. वारकरी व भाविक आषाढी एकादशीला पंढरपूर येथे जाऊ शकत नाही. ते मोठ्या संख्येने मुक्ताईनगर येथील नवे मुक्ताई मंदिर, कोथळी येथील जुने मुक्ताई मंदिर व मेहुणे येथील मुक्ताई मंदिरात मोठ्या संख्येने जात असतात. त्यांनी या मंदिरात दर्शन घेतले.

मुक्ताईनगर शहराजवळ असलेल्या संत मुक्ताई नवीन मंदिरात सकाळी ५ वाजता अभिषेक पूजा करून संत मुक्ताईची आरती करण्यात आली. वैकुंठवासी लक्ष्मण बळीराम चौधरी यांच्या स्मृती प्रित्यर्थ फराळाचे वाटप करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांतर्फे अभिषेक पूजा देखील सकाळी करण्यात आली. यावेळी विनायक हरणे महाराज उपस्थित होते. तसेच सायंकाळी गोमाजी संस्थांनचे ह. भ. प. दिलीप महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. मोठ्या संख्येने वारकरी व नागरिक नवीन मुक्ताई मंदिरात येऊन तसेच दिंड्या यांनी दर्शनाचा लाभ घेतला.

मुक्ताईनगर शहरापासून जवळच असलेल्या कोथळी येथील जुने मुक्ताई मंदिरात सकाळी ५ वाजता अभिषेक पूजा शरद बाबुराव पाटील बोदवड यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. तसेच फराळ वाटप शरद पाटील, बोदवड व राजेंद्र पानकर, मलकापूर यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. तसेच रात्री गुरुदेव भजनी मंडळ, मुक्ताईनगर यांच्या भजनाचा कार्यक्रम जुने मुक्ताई मंदिरात होत आहे. यावेळी दिंड्या व वारकरी देखील मोठ्या प्रमाणात येत असतात. जे वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूर जाऊ शकत नाही ते मोठ्या संख्येने येऊन या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेत असतात व शासकीय सुट्टी असल्याने कर्मचारी देखील सहपरिवार दर्शनाला आले होते. सकाळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा संत मुक्ताईचे दर्शन घेतले. यावेळी मुक्ताईला मोसंबीची आरास करण्यात आली होती.

मुक्ताईनगर तालुक्यातील मेहून येथील तापी-पूर्णा नदीच्या संगमावर असलेल्या नदीकाठावर संत मुक्ताई मंदिर, मेहून येथे सालाबादप्रमाणे खूप मोठी वारी आषाढी एकादशीला भरत असते. जे वारकरी आषाढीला पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊ शकत नाही ते मोठ्या संख्येने मेहुन येतील मुक्ताई मंदिरावर येत असतात. दरवर्षी पंचक्रोशीतील व इतर अशा सुमारे १४ ते १५ दिंड्या मेहुन मुक्ताई मंदिरात येतात. सुमारे पंधरा वर्षापासून दसनूर येथील स्वर्गीय संजय प्रभाकर पाटील यांच्या स्मरणार्थ फराळाचे वाटप केले. सकाळी ५ वाजता स्वर्गीय संजय पाटील यांचे कुटुंबीय व मुक्ताई देवस्थान सचिव दत्तात्रय किसन पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिषेक महापूजा केली. तसेच सकाळी कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.


 

 

Tags: #muktainagar news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

चोरलेला माल विक्री कराताना शिताफीने अटक, १५ मोबाईल जप्त

Next Post

धक्कादायक : पैशांच्या कारणावरून मित्राने हत्या करून मृतदेह पूर्णा नदीपात्रात फेकला !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धक्कादायक : पैशांच्या कारणावरून मित्राने हत्या करून मृतदेह पूर्णा नदीपात्रात फेकला !

धक्कादायक : पैशांच्या कारणावरून मित्राने हत्या करून मृतदेह पूर्णा नदीपात्रात फेकला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरमध्ये घराच्या अंगणातून २० हजारांची दुचाकी चोरीला
क्राईम

अमळनेरमध्ये घराच्या अंगणातून २० हजारांची दुचाकी चोरीला

October 18, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप; भडगावच्या १९ वर्षीय तरुणाला अटक
क्राईम

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप; भडगावच्या १९ वर्षीय तरुणाला अटक

October 18, 2026
पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ
क्राईम

घर बांधकामासाठी माहेरून ५ लाख आणण्याची मागणी

October 17, 2026
मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेरमध्ये घराच्या अंगणातून २० हजारांची दुचाकी चोरीला

अमळनेरमध्ये घराच्या अंगणातून २० हजारांची दुचाकी चोरीला

October 18, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप; भडगावच्या १९ वर्षीय तरुणाला अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप; भडगावच्या १९ वर्षीय तरुणाला अटक

October 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon