आकाश कंदील लावत असताना तिसऱ्या मजल्यावरून पडून कृषी पर्यवेक्षकाचा मृत्यू
जळगाव शहरातील खळबळजनक घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- दिवाळीनिमित्त घराच्या बाल्कनीमध्ये साफसफाई करत असतांना करत असतांना अचानक पाय घसरून सोसाटीच्या तिस-या मजल्यावरून खाली पडल्याने ५२ वर्षे इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरात मोहाडी रोडवर घडली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उल्हासराव चंद्रराव पाटील (वय-५२, रा. नित्यानंद सोसायटी, मोहाडी रोड,जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारास घडली आहे. उल्हासराव चंद्रराव पाटील हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह मोहाडी रोडवरील नित्यानंतर सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर वास्तव्याला होते. ते ममुराबाद येथील जिल्हा मृदा सर्व्हेक्षण व मृदा चाचणी विभागात कृषी पर्यवेक्षक म्हणून नोकरीला होते.
गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी ते त्यांच्या घराच्या बाल्कनीमध्ये साफसफाईचे काम करत होते. साफसफाई करतांना त्यांचा पाय घसरून तोल गेल्याने ते तिसऱ्या मजल्यावरून खाली पडले. त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच गर्दी जमली होती.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील करीत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुवर्णा, मुलगा हितेश आणि मुलगी हर्षदा असा परिवार आहे.