• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव मनपाच्या ऑनलाईन सभेत बहुमताने विषय मंजूर करण्यावरुन भाजप- सेनेच्या नगरसेवकांमध्ये ‘तू तू -मै मै !’

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 12, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव : – महापालिकेची आज ऑनलाईन महासभा पार पडली . या महासभेत महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या गाळ्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येऊन वॉटरग्रेस कंपनी आणि महापालिका प्रशासनात लवाद नेमण्याच्या विषयावरून भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये चांगलीच ‘तू तू -मै मै !’ झाली. शिवसेनेने हे दोन्ही विषय बहुमताच्या जोरावर मंजुर केले. मात्र, महासभा ऑनलाईन असताना बहुमत कसे सिद्ध केले? असा जाब विचारत भाजपचे काही सदस्य थेट सभागृहात दाखल झाले. यावेळी दोन्ही पक्षातील सदस्य आक्रमक झाल्याने जोरदार गोंधळ उडाला.
महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ही महासभा पार पडली. व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते.

महासभेत गाळ्यांचा विषय बहुमताने मंजूर झाल्यानंतर भाजपचे गटनेते भगत बालाणी, सदस्य कैलास सोनवणे, अॅड. शुचिता हाडा, विशाल त्रिपाठी, धीरज सोनवणे यांनी ऑनलाईन पद्धतीने विरोध नोंदवण्याचा प्रयत्न केला. पण गोंधळात हा विषय मंजूर झाला. त्यानंतर लवाद नेमण्याचा विषय नगरसचिव गोराणे यांनी वाचायला घेतला. हा विषय देखील बहुमताने मंजूर होत असल्याने भाजपचे सदस्य आक्रमक झाले.
त्यानंतर भाजपचे सदस्य कैलास सोनवणे, भगत बालाणी, धीरज सोनवणे आदी थेट सभागृहात दाखल झाले. त्यांनी हे दोन्ही विषय बहुमतांवर मंजूर केल्याबाबत आक्षेप घेतला. शिवसेनेने बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने वाद झाला

हा गोंधळ वाढत गेल्याने शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सदस्य प्रशांत नाईक, विष्णू भंगाळे, गटनेते अनंत जोशी, नितीन बरडे हे देखील सभागृहात दाखल झाले. त्यामुळे गोंधळ वाढला. त्यानंतर महापौर जयश्री महाजन यांनी ही महासभा ऑनलाईन असल्याने सदस्यांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितले. तेव्हा वाद मिटला.


 

 

Previous Post

महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन वाढणार ? मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक

Next Post

स्वतःच्याच निधनाची बातमी पाहून संतापले मुकेश खन्ना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

स्वतःच्याच निधनाची बातमी पाहून संतापले मुकेश खन्ना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

जळगाव शनिपेठ पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांची नियंत्रण कक्षात बदली; पोलीस दलात खळबळ

October 22, 2026
जळगाव हादरले : १० दिवसांच्या नवजात बालिकेला निर्जन स्थळी टाकले..!   तरुणाच्या सतर्कतेने जीव वाचला
क्राईम

जळगाव हादरले : १० दिवसांच्या नवजात बालिकेला निर्जन स्थळी टाकले..! तरुणाच्या सतर्कतेने जीव वाचला

October 22, 2026
जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय रामभरोसे..!
खान्देश

जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय रामभरोसे..!

October 22, 2026
कानळदा येथे ‘धर्मवीर फाऊंडेशन’, लोकसेवक मधुकरराव चौधरी महाविद्यालय ‘तर्फे विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांचे धडे
खान्देश

कानळदा येथे ‘धर्मवीर फाऊंडेशन’, लोकसेवक मधुकरराव चौधरी महाविद्यालय ‘तर्फे विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांचे धडे

October 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव शनिपेठ पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांची नियंत्रण कक्षात बदली; पोलीस दलात खळबळ

October 22, 2026
जळगाव हादरले : १० दिवसांच्या नवजात बालिकेला निर्जन स्थळी टाकले..!   तरुणाच्या सतर्कतेने जीव वाचला

जळगाव हादरले : १० दिवसांच्या नवजात बालिकेला निर्जन स्थळी टाकले..! तरुणाच्या सतर्कतेने जीव वाचला

October 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon