मान्यवरांची राहणार उपस्थिती
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील सेवानिवृत्त शिक्षक मनोहर देवचंद राणे लिखित “भगवतप्रणीत जीवनरेखा (सकल जनांसाठी)” व “म्हाताऱ्यांनो आनंदात जगा, सुखाने निरोप घ्या…” या दोन पुस्तकांचे प्रकाशन रविवारी दि. ११ रोजी संध्याकाळी ५. ३० मिनिटांनी होणार आहे. याप्रसंगी मान्यवरांची उपस्थिती राहील.
मनोहर राणे यांचे वय ८७ असूनही याही वयात त्यांनी जीवनावश्यक व ज्वलंत विषयावर लेखन केले आहे. यावल तालुक्यातील भालोद येथे त्यांचे शिक्षण झाले असून विदर्भातील खामगाव, चौगुला व जळगाव तालुक्यातील असोदा येथे त्यांनी शिक्षक म्हणूनअनेक विद्यार्थी घडविले आहे. त्यांनी, जर म्हातारपण “एन्जॉय” करायचं असेल यासाठीच्या टिप्स आणि आनंददायी जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारे “म्हाताऱ्यांनो आनंदात जगा, सुखाने निरोप घ्या…” हे लिहिलेले पुस्तक नक्कीच वृद्धाना प्रेरणादायी आहे.
तसेच सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी गीतेतील काही श्लोकांचे मराठीत निरूपणाचा प्रयत्न केला. संतांचे लेखन त्यांनी वाचले. यातूनच गीतेतील काही निवडक श्लोक व संत वचने या विषयावर मनोहर राणे यांनी “भगवतप्रणीत जीवनरेखा (सकल जनांसाठी)” या पुस्तकाचे मराठीत लेखन केले.
दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन रविवारी ११ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५. ३० वाजता होत आहे. याप्रसंगी अध्यक्षस्थानी केसीई सोसायटी अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आहेत. तर जळगाव पीपल्स बँकेचे मार्गदर्शक भालचंद्र पाटील, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, लेवा एज्युकेशनल युनियनचे सचिव व. पु. होले हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रसिकांना उपस्थितीचे आवाहन राणे परिवारातर्फे करण्यात आले आहे.