जळगावातील अयोध्या नगर परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील एमआयडीसी भागात काम करणाऱ्या एका तरुण सुरक्षारक्षकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्याचा मृत्यू झाला असून परिवारावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संतोष रामप्रसाद गौर (वय ४०, रा. अयोध्या नगर, मूळ रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश) असे मयत तरुणाचे नाव आहे. ते गेल्या २ वर्षांपासून ते बॉम्बे इंटेलिजन्स सिक्युरिटी लिमिटेड या सुरक्षा कंपनीत कामाला आहेत. त्यांचा परिवार हा गोरखपूर येथे वास्तव्याला आहे. त्यांना एमआयडीसी येथील एका कंपनीत सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली होती. शुक्रवारी रात्री ११ वाजता त्यांची ड्युटी संपल्यावर ते अयोध्या नगर येथील त्यांच्या खोलीवर गेले होते. रात्री कधीतरी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.
खोलीत दुसरं कोणी नसल्याने त्यांच्या मदतीला कोणी येऊ शकले नाही. सकाळी काही सुरक्षारक्षक सहकाऱ्यांनी त्यांना संपर्क केला असता हि घटना उघडकीस आली. दरम्यान, त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.