जळगाव (प्रतिनिधी) – महिला लोकशाही दिन जिल्हा स्तरावर दर महिन्याचा तिसरा सोमवार व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो. परंतु महिला लोकशाही दिन सोमवारी शासकीय सुटी असल्याने दि. २० फेब्रुवारी, मगळवार रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.